एस.टी .कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत समस्या तातडीने न सोडविल्यास बेमुदत उपोषण

34

🔸कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.12ऑगस्ट):-एसटी कर्मचान्यांच्या ज्वलंत समस्या तातडीने न सोडविल्यास बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने निवेदनाद्वारे दिला. एसटीचे विभागीय नियंत्रक महेंद्रकुमार नेवारे यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेचएस.टी. च्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले.

यावेळी विभागीय कार्यालय परिसरात कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.यापूर्वी कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या मागण्यांबाबत नोटीस दिली होती. त्यावेळी प्रशासनाने चर्चा सुरू असल्याचे सांगितल्याने आम्ही सहकार्याची भूमिका घेत प्रश्नांवर प्रशासनाने अद्यापही स्पष्ट केले नाही. एस.टी. च्या प्रशासनाने वेळोवेळी पगारवाढीच्या संदर्भातील त्रुटी द्यावी, तीन महिने उलटूनहीअद्याप एस.टी. कर्मचाऱ्यांच्या निर्णय घेतला नाही. त्यामुळे हे पत्र देत असल्याचे जाहीर केले.

शासकीय कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे वेतनवाढ, वेतनवाढीत दुरुस्ती करून सरसकट कर्मचारी, अधिकाऱ्यांना याचा लाभ द्यावा, यातील १ एप्रिल २०२० पासूनचा फरक तातडीने देण्याचा निर्णय घ्यावा, वेतनवाढ, घरभाड़े भत्तावाढ करण्याचा निर्णय घ्या, मागील घटना मृत्यू कालावधीत घडल्या, काहीचा मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुबातील एकाला अनुकंपा तत्वावर नोकरी द्यावी, कोरोनाने प्रलंबित असलेल्या बिलाची प्रतिपूर्ती करण्यात यावी, कोरोना काळातील विशेष भत्ता काही विभागात देण्यात आला नाही, तो तातडीने द्यावा.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मागील करारातली फरकाची रक्कम, रजा रोख थकबाकी तातडीने एक रकमी देण्याचा निर्णय घेण्यात यावा. मॅक्सिकॅबला परवानगी देऊ नये, नवीन गाड्या घेऊन राज्याची जीवनवाहिनी सक्षमकरावी, आदी मागण्या करण्यात आल्या.
निवेदन देताना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ नंदागवळी , विभागीय अध्यक्ष दिलीप घोडके, विभागीय सचिव प्रशांत भोयर तसेच विभागीय पदाधिकारी तसेच आगार पदाधिकारी उपस्थित होते.