हर घर तिरंगा… हर घर संविधान… अभियाना अंतर्गत दसरा चौकात भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे होणार जाहीर सामूहिक वाचन

31

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.12ऑगस्ट):-भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय तिरंगा व भारतीय संविधान प्रेमीं भारतीय नागरिक आपल्या हातात भारतीय तिरंगा घेऊन भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यासाठी 14 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 4:00 वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज पुतळ्या जवळ जमणार आहेत.

पीपल्स रिपब्लिकन पार्टी, सेक्युलर सोशल फ्रंट, निर्मिती विचारमंच, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, धम्म चक्र बुद्ध विहार संस्था, भीम प्रतिष्ठान, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, बुद्ध वंदना संघ, जय मल्हार सेवाभावी संघटना, सन्मान फाउंडेशन, बुद्ध गार्डन विकास संघ आणि समविचारी पक्ष, संघटनाच्या वतीने हर घर तिरंगा… हर घर संविधान… अभियाना अंतर्गत… भारतीय तिरंगा व भारतीय संविधानाच्या सन्मानासाठी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला म्हणजे 14 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 4:00 वा. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्या जवळ, कोल्हापूर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक जाहीर वाचन करण्यात येणार आहे.

प्रत्येकांच्या घरावर तिरंगा लावण्याबरोबरच भारतीय संविधानावर चालणाऱ्या भारतीय नागरिकांच्या प्रत्येकांच्या घरात भारतीय संविधानाचे वाचन होणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 14 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय तिरंगा व भारतीय संविधान प्रेमीं भारतीय नागरिक आपल्या हातात भारतीय तिरंगा घेऊन भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक डॉ. नंदकुमार गोंधळी, अनिल म्हमाने, डॉ. दयानंद ठाणेकर, विद्याधर कांबळे, सोमनाथ घोडेराव, सुरेश सावर्डेकर, अब्बास शेख, डॉ. रणजित भोसले, सुखदेव बुध्याळकर, संतोष कांबळे, सनी गोंधळी, संभाजी वायदंडे, मिरासाब कोलप, दिलीप थोरात, रतन कांबळे यांनी केले आहे.