मांडवा येथे बंजारा समाजातील महिलांचा तीज महोत्सव

34

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.12ऑगस्ट):-बंजारा समाजातील महिलांचा तीज महोत्सव आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक समाज घटक वेगवेगळे उत्सव आपल्या वेगळ्या ढंगाने आणि परंपरेने साजरा करतात.त्याचप्रमाणे बंजारा समाजात तीज उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कधीकाळी डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजात तीज म्हणजे आनंदाची पर्वणीच असते…सध्या श्रावण महिन्यात ठिकठिकाणच्या बंजारा तांड्यांवर तीज उत्सवाची धूम पाहायला मिळेल.

सध्या तीज उत्सवाच्या बंजारा लोकगीतांनी तिथल्या लोकांवर चांगलच गारुड घातल आहे…काय आहे बंजारा लोकसंस्कृती?, कसं महत्व आहे या समाजात तीजेच? पारंपारिक वेशभूषेत फेर धरून नाचणाऱ्या ह्या महिला तुम्हाला वाटत असेल एखाद्या कार्यक्रमात अथवा लग्नात त्यांनी असा फेर धरला असेल… पण, हा उत्साह आहे तीजेचा…बंजारा समाजातील तीज दृश्यातील हा उत्साह आहे. पुसद तालुक्यातील मांडवा येथील बंजारा समाजाने आपली वेगळी परंपरा, लोकसंस्कृती आणि वेगळेपण अजूनही जपल आहे.

हे वेगळेपण अगदी चालीरीती, पेहराव आणि बोलीभाषा या सर्वांमध्येच आलं. तीज हा उत्सव म्हणजे बंजारा समाजाची दिवाळीच बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे सर्व पदर आणि पैलू उलगडणारा उत्सव म्हणजेच तीज मुळात बंजारा समाजातील तीज उत्सव दहा दिवस साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील राखी पौर्णिमेपासून त्यांच्या तीज उत्सवाला सुरुवात होते. याची चाहूल आणि लगबग या दिवसापासून बंजारा तांड्यांमध्ये होते.

ती बंजारा लोकगीतांनी फ़क़्त मौखिक असणाऱ्या या गितांमध्ये कृष्णावर गीत म्हटली जातात. दहा दिवसाआधी अविवाहित मुली एका टोपलीत ‘गौरी स्वरूप’ धान (गहू) पेरतात, रोज त्याला पाणी घालून बोलीभाषेत कृष्णाची गीते म्हटली जातात. या समाजातील लहान-मोठ्या महिलाही पुरुषांच्या बरोबरीने म्हणा की त्यांच्या पेक्षाही जास्त उत्साहाने या उत्सवात सहभागी होत असतात,

याकाळातील बंजारा लोकगीतं त्यांच्या संस्कृतीला समृद्ध आणि संपन्न करणारी असतात. तीज उत्सवाच्या काळात गाण्यात येणारी लोकगीतं आणि परंपरांमध्ये महिलांचं स्थान ठसठशितपणे समोर येतं. यासोबतच अनेक रूढी परंपरा या बंजारा समाजात आहेत. या तीज उत्सावामध्ये व विसर्जनाच्या वेळी नायक वसंता आडे,कारभारी तुकाराम चव्हाण, बायजा आडे, वनिता आडे, सिंधु आडे, अनिता आडे, सावित्रीबाई चव्हाण, निशा राठोड, राधा चव्हाण, अंशी चव्हाण, पंचफुला आडे, ग्रा.पं.सदस्य कविता आडे,झामु आडे, कलाबाई पवार, प्रिया आडे, कांता चव्हाण, विमल राठोड, प्रमिला आडे, लिला राठोड, कलावती राठोड, रंजना राठोड, कविता राठोड, उषा राठोड, पुरना चव्हाण, तसेच इतर महिला , युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.