स्वातंत्र्या

26

स्वातंत्र्या

तुझा जयजयकार करण्यापेक्षा
तू माझ्या हृदयात कोरलाआहे..
तू तर कामगार व शेतकऱ्यांच्या
घामाने फुलला आहे..

हर घर तिरंगा लावून
स्वातंत्र्य तुझे रक्षण होणार नाही.
सत्तेच्या भोगविलासानी
स्वातंत्र्य तर गुलाम केले आहे…

इथला हर इव्हेंट
नफाखोरीचा आहे.
देशाला विकण्याचा हाच
तर खरा घाट आहे…

तिरंग्या तू तर
देशाची शान आहे.
सैनिकांची तू
महाऊर्जा आहे..
दुश्मनाला खापरे भरणारा
तू महाज्वाला आहे ..

म्हणून स्वातंत्र्या,
तुझा जयजयकार करण्यापेक्षा
तू साऱ्या भारतीयांच्या
हृदयात कोरला आहे ..
संविधानिक लोकशाहीचा
खरा प्रकाशदीप ठरला आहे…

✒️संदीप गायकवाड(नागपूर)मो:-9637357400