राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात “आंतरराष्ट्रीय युवा दिन” साजरा

53

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.13ऑगस्ट):-गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील तरुणांची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक या विषयांवर मते जाणून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालय , तसेच एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र चिमुरचे कामिनी हलमारे, श्री.बांडेबुचे, सुमित साखरे, वाणिज्य विभागाचे डॉ. हरेश गजभिये, रासेयो विभागिय समन्वयक प्रा. पितांबर पिसे, प्रा. राजेश्वर रहांगडले, डॉ. लक्ष्मन कामडी, डॉ. उदय मेंडूलकर, प्रा. आशुतोष पोपटे प्रा.निखील पिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रफुल राजुरवाडे संचालन करताना म्हणाले की, युवक हा समाजात बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. आंतरराष्ट्रीय संयुक्तराष्ट्र संघटना या वर्षी १३ ते १५ वयोगटाच्या युवकाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रसंगी कामिनी हलमारे यांनी एड्स या भयंकर रोगा विषयी विद्यार्थ्याना माहिती दिली. रेड रिबन क्लब च्या वतीने जगभरात एड्स व सिकलसेल हे आजारनिर्मलून विषयीची भूमिका विशद केली.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा एन.सी.सी. लेफ्टनंट डॉ. प्रफुल्ल बन्सोड यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्य विद्यार्थांना शपथ दिली. उपस्थितांचे आभार डॉ. नितीन कत्रोजवार यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंखेने विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतरवृंद उपस्थित होते.