राजकारणात मोठे व्हायचे असेल तर कार्यकर्त्यावर प्रेम करा

31

🔸आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांची कार्यकर्त्याप्रति कृतज्ञता वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.13ऑगस्ट):- राजकारणात मोठे व्हायचे असेल तर लहान कार्यकर्त्यावर प्रेम करा. त्यांच्या सोबत राहा. मोठा कधीच कुणाला उंचीवर जाऊ देत नाही. लहान कार्यकर्ताच आपल्याला मोठा करतो. आपल्यावर किती प्रेम आहे, हे बघायचे झाल्यास आपल्या घरचे लग्न समारंभ, वाढदिवस व अंत्यविधी या कार्यक्रमात जमलेला जनसमुदाय हीच आपल्या कामाची पावती होय. आज उपस्थित झालेली जनसामान्यांची गर्दी म्हणजेच माझ्या कामाचा मोबादला आहे, असे भावनिक प्रतिपादन गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी यांनी केले.

आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील कापसे गार्डन येथे राष्ट्रीय समाज पक्ष आणि आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाने मोठ्या उत्साहात आयोजित हभप.रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तन सोहळा प्रसंगी जाहीर सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, उद्योजक सुनील गुट्टे, गंगाखेड शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे, हभप.झोलकर महाराज, हभप भगवान महाराज इसादकर, हभप रोहिदास महाराज मस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य व रासपचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश दादा रोकडे, किशनराव भोसले, राजेश फड, नंदकुमार पटेल, रासपचे युवक प्रदेश अध्यक्ष राजेभाउ फड, रासपचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप आळनुरे, विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, गंगाखेड प्रभारी हनुमंत मुंढे, तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, जिल्हा सरचिटणीस रवी कांबळे, माजी सभापती मुंजाराम मुंढे, मगर पोले, नितीन बडे, राधाकिशन शिंदे, सत्यपाल साळवे, राजू खान, अकोलीचे सरपंच संभाजीराव पोले उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, आपण भरभरून प्रेम दिले तर जनता सुध्दा आपल्यावर किती तरी जास्त पटीने प्रेम करते. आज राजकीय, सामाजिक, शैक्षणिकसह इतर क्षेत्रातील मंडळी केवळ प्रेमामुळे येथे दिसत आहे. काहींनी पुष्पगुच्छ दिले. काहींनी केक आणले. काहींनी शाली दिल्या. तर काहींनी माझ्या दीर्घयुष्यासाठी साकडे घातले, हीच माझ्या कामाची खरी पावती आहे.
आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त गंगाखेडसह पालम आणि पूर्णा तालुक्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक उपक्रमांनी संपूर्ण दिवस गजबला होता. कार्यक्रमांना भेटी देताना आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांचा ताफा प्रत्येक गावात थांबवून ग्रामस्थ मोठ्या आनंदाने आपल्या लाडक्या आमदार साहेबांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देत होते. तर अनेकांनी खास केकही बनवून घेतले होते. तसेच ठिकठिकाणी जेसीबीतून फुलांची उधळण आणि भव्य अशा हाराचेही दर्शन झाले.

आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या बनपिंपळा येथील निवास स्थानी मध्यरात्री ठिक रात्री हजारो समर्थकांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर भल्या पहाटे सकाळी ठिक साडेपाच वाजता गंगाखेड नगर पालिकेच्या स्वच्छता कर्मचा-यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून साडी, चोळी, मिठाई व कपड्याचे वाटप करण्यात आले.

त्यानंतर विविध जाती धर्मांच्या आराध्य देवातांचे दर्शन, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन, ध्वज वाटप, कबड्डी खेळाडूंना किट वाटप, उपजिल्हा रूग्णालयात फळे वाटप, जिल्हास्तरीय वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, पालम मध्ये शालेय साहित्य वाटप, पूर्णा येथे २६४ महिलांना डस्टबीन वाटप, सर्व रोगनिदान शिबीर असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी सर्व कार्यक्रमांना जनतेची उत्स्फूर्त गर्दी लक्षणीय होती.
दरम्यान, विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न झालेल्या आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा यशस्वी करण्यासाठी आ.डॉ.गुट्टे यांचे चिरंजीव उद्योजक सुनील गुट्टे यांच्या मार्गदर्शनात रासपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप आळनुरे, पालम-पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, गंगाखेड प्रभारी हनुमंत मुंढे, रासप जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब एंगडे, रासप गंगाखेड तालुकाध्यक्ष शेषेराव सलगर, पूर्णा तालुकाध्यक्ष गणेश कदम, रासप तालुकाध्यक्ष जगन्नाथ रेणगडे, पालम तालुकाध्यक्ष बालासाहेब रोकडे, शहराध्यक्ष अजिउल्ला खान पठाण, नगरसेवक उबेद खान पठाण, रहिमतुल्ला खान, मोबिन कुरेशी, समीर पठाण, माजी सभापती गणेशराव घोरपडे, नारायण दुधाटे, माजी उपनगराध्यक्ष राधाकिसन शिंदे, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, राजू पटेल, सामाजिक कार्यकर्ते बाबा पोले, जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे, अ‍ॅड.मिलिंद क्षिरसागर, दलित आघाडी जिल्हाध्यक्ष राहूल बनाटे, दीपक तापडीया, सतीश घोबाळे, जुनेद कुरेशी, बाबुराव इंगळे, इकबाल चाऊस, खालेद शेख, सचिन नाव्हेकर, सचिन महाजन, हरिभाऊ सावरे, उध्दव शिंदे, वैजनाथ टोले, महेश टोले, राजू खान, शेख गौस, एकनाथ गेजगे, बाळासाहेब टोले, पप्पू घरजाळे, संजय पारवे, बापूराव डुकरे, कैलास काळे, सुदाम वाघमारे, दत्तराव पौळ, नवनाथ भुसारे, नारायण मोरे, शिवाजी अवरगंड, मारूती मोहिते, उध्दव शिंदे, डॉ.रामराव उंदरे, गणेश हत्तीअंबीरे, विजय घोरपडे, भगवान शिरसकर, गजानन रोकडे, राहूल शिंदे, स्वीय सहाय्यक विठ्ठल सातपुते, संजय मुंढे, गोपी नेजे, शाम ठाकूर, राहूल गाढे, चेतन पंडित, तुकाराम पोले, अभिजीत चक्के, मारूती पोले, धनराज बीडगर, सुनील तांदळे, वैभव मुंढे, हनुमान गुट्टे आदींनी पुढाकार घेतला.

सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक संगम…
आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त गंगाखेड येथील कापसे गार्डन येथे ह.भ.प.रामराव महाराज ढोक तर पूर्णा येथे ह.भ.प.प्रकाश महाराज साठे यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. तसेच अनेक ठिकाणी शैक्षणिक साहित्याचे वाटप, सर्व रोग निदान शिबीर, रक्तदान, स्वच्छता कर्म-यांना कपडे वाटप, रूग्णांना फळे वाटप यामुळे सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक सोहळ्याचा संगम पाहायला मिळाला.

ये दोस्ती हम नहीं तोंडगे…
आ.डॉ.रत्नाकर गुट्टे आणि अहमदपूरचे माजी मंत्री विनायक पाटील यांची मैत्री अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. त्यामुळे माजी मंत्री विनायक पाटील यांनी कापसे गार्डन येथे उपस्थित राहून आ.डॉ.गुट्टे यांचा जाहीर सत्कार करून गौरवोदगार काढले. तेव्हा उपस्थितांना राजकारणाच्या पलिकडचे हे मैत्र व जिव्हाळा पाहून ‘ये दोस्ती हम नहीं तोंडगे‘चा प्रत्यय आला.