75 हजार भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाटप- हर घर तिरंगा… हर घर संविधान…

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.15ऑगस्ट):- भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यातील निर्मिती विचारमंच, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, सेक्युलर सोशल फ्रंट, धम्म चक्र बुद्ध विहार संस्था, भीम प्रतिष्ठान, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, बुद्ध वंदना संघ, जय मल्हार सेवाभावी संघटना, सन्मान फाउंडेशन, बुद्ध गार्डन विकास संघ आणि समविचारी पक्ष, संघटनाच्या वतीने हर घर तिरंगा… हर घर संविधान… अभियाना अंतर्गत… भारतीय तिरंगा व भारतीय संविधान प्रेमीं भारतीय नागरिकांना 75 हजार भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाटप करण्याचा निर्धार करण्यात आला.

यातील पहिला भाग म्हणून 14 ऑगस्ट 2022 रोजी कोल्हापूर येथिल दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज पुतळ्या जवळ भारतीय तिरंगा व भारतीय संविधानाच्या सन्मानासाठी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून पहिल्याच दिवशी दहा हजार भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाटप करण्यात आले.प्रत्येकांच्या घरावर तिरंगा लावण्याबरोबरच भारतीय संविधानावर चालणाऱ्या भारतीय नागरिकांच्या प्रत्येकांच्या घरात भारतीय संविधानाचे वाचन होणे आवश्यक आहे ही भूमिका घेऊन हा उपक्रम राबविला जात आहे.

यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय तिरंगा व भारतीय संविधान प्रेमीं भारतीय नागरिक आपल्या हातात भारतीय तिरंगा घेऊन भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ. नंदकुमार गोंधळी, अनिल म्हमाने, ऍड. करुणा विमल, विद्याधर कांबळे, सोमनाथ घोडेराव, सुरेश सावर्डेकर, अब्बास शेख, डॉ. रणजित भोसले यांची भाषणे झाली. यावेळी विमल पोखर्णीकर, अरहंत मिणचेकर, अरुण जगधने, विनोद शिंदे, शब्बीर शेख, मनु भोसले, प्रभू यादव, रामायण यादव, संतोष हिरवे, तानाजी निकम, बाळासाहेब माने, खालीत बागवान, मीरा घोडेराव, संतोष कांबळे, सनी गोंधळी, संजय गोरे, संभाजी वायदंडे, मिरासाब कोलप, दिलीप थोरात, रतन कांबळे यांच्यासह संविधानप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED