मूकबधिर विद्यालय येथे स्वातंत्र्यदिनाचा ७५ वा अमृत महोत्सव उत्सवात साजरा

✒️धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर

धरणगाव(दि.१५ऑगस्ट):- रोजी जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, के.जी.गुजराथी मुकबधिर विद्यालय, मतिमंद विद्यालय, मूकबधिर निवासी कार्यशाळा धरणगाव येथे ७५ व्या अमृत महोत्सव स्वातंत्र्यदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

ध्वजारोहण पुरुषोत्तम मार्तंडराव साळुंखे साहेब ( बिल्डर,कॉन्ट्रॅक्टर तसेच उपाध्यक्ष ज.शि.प्र.मं.धरणगांव ) यांच्या शुभहस्ते करण्यात आला.व मा.अण्णासाहेब गवळे सर (जळगाव)यांच्या शुभहस्ते गुणवंत व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.आलेल्या मान्यवरांचा सत्कार मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाल्मीक पाटील यांनी केले व उपस्थित पालकवृंदांचे स्वागत मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना आर.एस.पाटील सर यांनी केले ह्या प्रसंगी पालक शेख सर (कासोदा)यांनी मनोगत व्यक्त केले व शाळेच्या भरभराटी साठी शुभेच्छा दिल्या. तदनंतर विद्यार्थ्यांचे सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुत्रसंचालन मा.संतोष भडांगे सर यांनी केले.याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

धरणगाव, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED