बसपाच्या वतीने स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा

✒️श्रीरामपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

श्रीरामपुर(दि.16ऑगस्ट):- बहुजन समाज पार्टी श्रीरामपूर विधानसभेच्या वतिने अमृत महोत्सवी स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी बोलताना अहिरे म्हणाले की, १५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश इंग्रजाच्या गुलामगितून मुक्त झाला. हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन होय.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, सुभाषचंद्र बोस अशा अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण पणाला लावले. आज आपण मुक्तपणे श्वास घेतीय त्याचे सर्व श्रेय या देशपुत्रांचे आहे. श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष जाकीर शहा यांचेसह विधानसभा महासचीव भारत त्रिभुवन, विधानसभा सचिव अरुण हिवराळे, मा. मच्छिंद्र ढोकणे, लतीफा महमदं शेख गोंधवणी रोड शाखा अध्यक्षा , शहर सचिव संजय सूर्यवंशी, शहर संघटक कृष्णा कदम, नरसाळी शाखाध्यक्ष महेश गायकवाड, तानीया शेख , दिपक मोरे, महेश मोरे, आप्पा मगर, संतोष ढोकणे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED