फुटपाथ शाळेत ध्वजारोहण करीत केले वृक्षारोपण-देशप्रेमामुळे प्रत्येक नागरिक हा देशाला बघतो प्रथम स्थानी

37

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

देवळी(दि.15ऑगस्ट):-स्वातंत्र्याच्या 75 वा आजादी का अमृत महोत्सव याप्रसंगी स्थानिक देवळी शहरातील तहसील कार्यालयासमोरील झोपडपट्टीमध्ये भटक्या जमातीचे नागरिक वास्तव्य करीत असून त्यांची मुले इतरत्र भटकत असायचे म्हणून त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या आशेने भारत सामाजिक विकास ग्रुपच्या माध्यमातून चालवीत असलेल्या “फुटपाथ शाळा” मागील एक वर्षापासून ग्रुपचे सदस्य अथक प्रयत्न करीत आहे त्यामध्ये कुठलीही अपेक्षा किंवा मोबदला न घेता त्यांना शारीरिक , मानसिक , शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी तर त्यातील काही मुलांना स्थानिक देवळी शहरातील शाळेत दाखल सुद्धा केलेले आहेत अशातच आज 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस या निमित्ताने आम आदमी पार्टीचे जिल्हा सहसंयोजक किरणजी पारिसे व माजी होमगार्ड वरिष्ठ पलटण नायक नरेंद्रजी जोशी तसेच ज्येष्ठ पत्रकार गणेशजी शेंडे , युवा पत्रकार सचिन वैद्य , रवींद्र पारिसे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले त्यात विशेष म्हणजे समाजाला “झाडे लावा झाडे जगवा” असा पर्यावरणबद्दल संदेश जावा यासाठी विद्यार्थ्यांनी फूटपाथ शाळेच्या शिक्षिका रेणुका दूरबुडे यांना वाढदिवसानिमित्त वृक्ष भेट देऊन सर्वांच्या उपस्थितीत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

त्यानंतर मान्यवरांनी आपले मत मांडले की क्रांतीकारांनी छाताडावर गोळ्या झेलल्या आणि भारत मातेला इंग्रजांच्या दास्यातून मुक्त केले देशप्रेम नसते तर भारतीय स्वतंत्र्यात मुक्त श्वास घेणारे भारतीय आजही परदास्यतेच्या जोखंडात बांधून राहिले असते देशप्रेमामुळे प्रत्येक नागरिक हा देशाला प्रथम स्थानी बघतो आणि आपल्या देशासाठी काही करता येईल का याचा विचार करतो देशासाठी काही करणे म्हणजे फक्त हातात बंदूक घेऊन जवान बननेच नव्हे तर छोट्या छोट्या गोष्टीत आपण आपले देशप्रेम दर्शवू शकतो अशा पद्धतीचे मत मांडले तर या कार्यक्रमाचे संचालन रेणुका दुरबुडे तर तनुश्री गायकवाड यांनी आभार मानले तसेच विद्यार्थी रोशन शिंदे , गजानन पवार ,श्रीराम पवार ,अजय पवार ,दीपक पवार ,योगेश तांबे ,निशा तांबे , दुर्गा पवार ,पूजा पवार , आरती पवार , साजन , तनुश्री व हर्षल दुरबुडे इत्यादी उपस्थित होते त्याचप्रमाणे इतर लोकांनी सहभाग घेत सहकार्य केले.