शेणगांव येथे निःशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

26

🔹स्वातंत्र्याच्या अमृत महोस्तवाचे ओचित्य साधतं अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.16ऑगस्ट)- याच निमित्ताने नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगांव येथे आचार्य विनोबा भावे सावंगी (मेघे) वर्धा, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर व प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगांव यांच्या सहकार्याने समता फाउंडेशन द्वारा निशुल्क मोतीबिंदू लेन्स, नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोज बुधवार ला सकाळी १० ते दुपारी १ वाजता पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगांव येथे करण्यात आले आहे शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णाला त्यांच्या तपासणीनुसार

मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे)/ जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे मोफत शस्त्रक्रिया केली जाईल, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचा चा प्रवास राहण्याची व जेवणाची मोफत सोय करण्यात येईल, शिबिरात मोतीबिंदू आढलेल्या रुग्णांना ऑपरेशनची तारीख शिबिराच्या दिवशी दिली जाईल अशी माहिती एका प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे दिली असून परिसरातील जास्तीत जास्त रुग्णांनी व गरजुनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील टेंभे व प्रा. आरोग्य केंद्र पाटण वैद्यकीय अधिकारी पाटण डॉ.कविता शर्मा, डॉ.छाया शेडमाके .प्रा.आ.केंद्र शेंगगाव वैद्यकीय अधिकारी डॉ.अबीद शेख डॉ.विद्या खानसोळे,व आरोग्यदूत स्वयंसेवक गोविंद गोरे यांनी केले आहे.