धरणगाव – वर्ल्ड व्हिजनच्या टीमसह जि.प. शाळा वंजारी बु॥ता. धरणगाव येथे स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा

✒️पी.डी पाटील(धरणगाव प्रतिनिधी)

धरणगाव(दि.16ऑगस्ट):-जि.प.प्राथमिक शाळा वंजारी बु॥ येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला .वर्ल्ड व्हिजन या आंतरराष्ट्रीय संस्थेचे धरणगाव तालुक्याचे व्यवस्थापक श्री. अनिल वल्लुरकर यांच्या हस्ते शाळेचे ध्वजारोहण करण्यात आले. गावातील लोकांनी विविध कार्यक्रमाद्वारे शिक्षक लोकांची मने जिंकून घेतली वर्ल्ड व्हिजन या संस्थेने वंजारी बु॥ हे गाव 15 वर्षांसाठी दत्तक घेतले असून शाळेचे मुख्याध्यापक श्री किशोर पाटील सर यांनी वर्ल्ड व्हिजन या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना, विचार, हेतु, याविषयी गावकऱ्यांमध्ये जाणीव-जागृती केली. ही संस्था आर्थिक-सामाजिक दुर्बल घटकांतील जीवनमान दूर करण्याच्या मानवतावादी दृष्टिकोनातून धरणगाव तालुक्यात काम करीत आहे.

निधी प्राप्त झाल्यास जि.प.शाळा वंजारी बु॥ येथे सुसज्ज स्वयं वित्त असे चे किचनशेड बांधण्याचे वर्ल्ड व्हिजन चे तालुका व्यवस्थापक श्री अनिल सरांनी आश्वासित केले. गेल्या तीन वर्षापासून वंजारी बु॥ विकासाच्या दुष्टीने गावातील विविध योजना शाळेसाठी World Vision राबवत आहे. यांचा शाळा गावात अभिमान व समाधान आहे. श्री. राजेंद्र पाटील सर.श्रीमती. वर्षा साळुंखे मॅडम व श्रीमती. रुपाली शिंदे मॅडम शाळेतील शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED