वेकोलीने जडवाहतूक तात्काळ मुंगोली पुलीया वरुन बंद करा…ज्योतीताई माथुलकर

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.17ऑगस्ट):-घुग्घुस येथून काही अंतरावर दि.१६ आगष्ट मंगळवार रोजी संध्याकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत मुंगोली पुलियाजवळ वेकोलीचे ट्रक थांबवण्यात आले. काही दिवसा पहिले मुंगोली पुलियावर पूर आल्यामुळे पुलियाची डागडुगीचे काम सुरू होते सुरू असताना दुपारी पाच वाजता तिथे सिमेंट टाकण्यात आलं होत. एका साईडने सिमेंट टाकल्यावर ८ वाजता दुसऱ्या साईडने ही सिमेंट टाकल्या जात होतं त्यामुळे साईटचा रोड सुरू होता तिथूनच वेंगोली चे ट्रक ,बाईक्स आणि इतर वाहन सुरू होते, ट्रक वाल्यांना स्पीडची मर्यादा नाही ते दुचाकी वाहनला जागा देत नाही आणि वरून एक दुचाकी वाहन अक्षरशः नदीमध्ये पडता पडता वाचले ती दुचाकी वाहन सरपंचा सौ.ज्योतीताई माथुलकर यांची होती. गट ग्रामपंचायत माथूली , जुगाद ,कैलाश नगर सरपंच सौ. ज्योतीताई माथूलकर व त्यांचे पती, लहान मुलगा दुचाकी वाहन गाडीने जात असताना त्यांच्या मागेच एक ट्रक वेगाने येत होते आणि समोरूनही ट्राफिक चालूच होते त्यामुळे त्यांची गाडी एक्साइड नदीत पडता,पडता व जीवहानी होता,होता टळली.

ट्रक वाल्यांची स्पीड पाहून त्यांनी ट्रक वाल्यांना थांबवले , वेेकोलीच्या सिव्हिल इंजिनियरला त्यांनी बोलवले व त्यांना हे काम कसे सुरू आहे हे विचारले. चुकीच्या पद्धतीने होणार काम पाहून सिव्हिल इंजिनियर ला बजावले तर सिव्हिल इंजिनियर ने सरपंचाला सरळ बोलले की *आप अपना काम करो हम अपना काम कर रहे है* आणि तो तिथून निघून गेला, जुगाद,माथुली व कैलास नगरच्या सरपंचा सौ.ज्योतीताई सुनील माथूलकर तिथे इतर सदस्यांना बोलवण्यात आले चक्काजाम केला ही समस्या ये,जा करणारे कामगार व आजुबाजु परिसरातील नागरिकांची आहे असे पाहून सब एरिया मॅनेजर यांना बोलवण्यात आले त्यांच्याशी संवाद साधला तिथेच बाजूने रोडवर टायरही ठेवण्यात आले होते ,रात्रीची वेळ आहे त्या टायरला रेडियम सुद्धा लावलेले नाहीत ही लापरवाही वेकोली प्रशासनाची दिसून आली व ते सिमेंट ही सध्या ओलेच फक्त दिखाव्या करण्यासाठी डागडुगी सुरू आहे. हे दाखवण्यात येत होतं तिथे हे सर्व होत असताना गावातील नागरिक व ग्रामपंचायत सदस्य आले.व जलवाहतूक तात्काळ बंद करा असे बोलले जात आहे.

यावेळी जुगाद, माथोली सरपंचा सौ. ज्योतीताई सुनील माथूलकर, ग्रामपंचायत सदस्य कुणाल डोये, विनय पिंपळकर ,शिवनी गावचे सदस्य विश्वास बोरपे, साखरा ग्रामपंचायत सरपंच निलेश पिंपळकर ,कोलगाव ग्रामपंचायत सरपंच गजानन जेणेकर व इतर सदस्य तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED