सुदामभाऊ राठोड यांच्या प्रयत्नाला यश-शेडवाही येथील वीज पीडित कुटुंबियांना चार लाखाची आर्थिक मदत

38

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.19ऑगस्ट):- तालुक्यातील शेडवाही येथील युवक अनिल सोयाम रानात बकरी चारण्यासाठी गेले असताना अचानक वीज पडून दुर्दैवाने मृत्यू झाला व सोबतच दहा ते बारा बकऱ्या सुद्धा मेल्या ,या घटनेची दखल घेऊन जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी शासनाला वारंवार पाठ पुरावा केला व जिवती येथे सुदामभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात आंदोलन सुद्धा करण्यात आले.

अखेर शासनाने पीडित कुटुंबियांना चार लाखाची आर्थिक मदत मंजूर केली व स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पीडित कुटुंबियांना धनादेश देण्यात आला .सुदामभाऊ राठोड यांनी शासनाचे आभार व्यक्त केले.