विजयसिंह पंडितांच्या हस्ते सुशी वडगाव येथे ७३ लक्ष रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ संपन्न

44

🔸पं.स.सदस्य परमेश्वर खरात यांच्या पाठपुराव्याला यश

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.19ऑगस्ट):-तालुक्यातील बंगालीपिंपळा पंचायत समिती गणात माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुशी, वडगाव येथे ७३ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि. १९ रोजी सकाळी ११ वा.संपन्न झाला.यावेळी शुभारंभप्रसंगी श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थानचे महंत दत्ता महाराज गिरी यांच्यासह गटविकास अधिकारी डॉ.सचिन सानप, हिंमत खरात, इंजी.चोपडे, महिला व बालविकास अधिकारी थोरात, पंचायत समिती सदस्य परमेश्वर खरात, पं.स.सदस्य जयसिंग जाधव, इंजी जगताप यांच्या सह आदि उपस्थित होते.

गेवराई तालुक्यातील मौजे सुशी येथे जलजीवन मिशन अंतर्गत ४३ लक्ष रुपये किंमतीची नळ पाणीपुरवठा योजना, वडगाव सुशी येथे ४ लक्ष रुपये किंमतीच्या पेव्हर ब्लॉक,मौजे सुशी तांडा येथे ६ लक्ष रुपये किंमतीचा सिमेंट रस्ता आणि २० लक्ष रुपये किंमतीच्या सुशी ग्रामपंचायत भवन बांधकामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन पं.स.सदस्य परमेश्वर खरात, व ग्रामस्थांनी केले होते. यावेळी विकास कामे दर्जेदार करण्याचे आवाहन विजयसिंह पंडित यांनी केले.

गेवराई पंचायत समितीचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते परमेश्वर खरात यांनी बंगालीपिंपळा गणात विविध विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला, त्यांच्या प्रयत्नांमुळे या भागातील विकास कामांना गती मिळाली. पंचायत समितीमध्ये सातत्याने आक्रमक भुमिका त्यांनी घेतली त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित विकास कामे मार्गी लागली आहेत असे प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. आपल्या भाषणात विजयसिंह पंडित यांनी पंचायत समिती सदस्य तथा गटनेते परमेश्वर खरात यांच्या कामाची प्रशंसा केली. बंगालीपिंपळा पंचायत समिती गणातील मौजे सुशी वडगाव येथील ७३ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करताना ते बोलत होते. जलजीवन मिशन अंतर्गत मौजे सुशी येथील नळ पाणीपुरवषठा योजना, मग्रारोहयो अंतर्गत ग्रामपंचायत भवन बांधकाम, 15 व्या वित्त आयोग निधी अंतर्गत मौजे सुशी तांडा येथे सिमेंट रस्ता तर मौजे वडगाव येथे पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ह.भ.प.दत्ता महाराज यांनी आशिर्वाद दिले.

यावेळी गटविकास अधिकारी डॉ.सचिन सानप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परमेश्वर खरात यांनी तर सुत्रसंचालन व आभार भक्तराज पौळ यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास लक्ष्मण पौळ, नामदेव गिरी, वडगावचे सरपंच बबन औटे, विठठल महाराज पौळ,नंदकुमार पौळ, धोंडीराम चव्हाण, उपसरपंच अर्जुन फरताडे, उत्तम तुरुकमारे, मुक्ताराम मोंढे, चंद्रकांत पौळ, मधुकर मोंढे, तिर्थराज पौळ, भारत जरे, पासुभाई शेख, सर्जेराव मोंढे, दिलिप मोंढे, अल्ताफ शेख, घुगे, माने, घनशाम फरताडे, बाजीराव तुरुकमारे, गणपण पौळ,नंदु मोंढे, विष्णू आडे, विक्रम कदम, चक्रधर मोहिते अलिम पठाण, जाधव, सूर्यभान पौळ, अजित काळे, विनोद पवार, वचिष्ठ काळे, आयुबभाई शेख, सारंग पौळ, भाऊसाहेब पौळ, रामेश्वर उदागे, बाळासाहेब माने, रामराव चव्हाण, ढाकणे मामा, जगन्नाथ भोसले, महेश भोसले, अशोक पवार,मच्छिंद्र फरताडे, सोमा सुराशरे, मुख्तार शेख, वसंत पवार,विठ्ठल राऊत यांच्यासह सुशी आणि वडगाव येथील ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच, उपसरपंच, सन्माननिय ग्रा.पं. सदस्य व सुशी, कवडगांव, सुशी तांडा येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.