✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.20ऑगस्ट):-तालुका हा डोंगराळ व अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो, या जिवती तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी व कष्टकरी वर्ग वास्तव्यास आहे,शेतमजुरी आणि शेती करून आपला उदरनिर्वाह करतात.सर्व शेतकरी आपल्या बँकेमध्ये शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा या आशेने खाते उघडले आहे,तरी आपण सर्व शेतकऱ्यांचे होल्ड केलेले खाते नियमित सुरू करून द्या .कारण अकाउंट होल्ड केल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे

म्हणून शेतकऱ्यांना होणार त्रास कमी व्हावा या उद्देशाने स्वतः जातीने लक्ष घालून सर्व शेतकऱ्यांचे होल्ड केलेले खाते नियमित चालू करून सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्याल असे निवेदन जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी भारतीय स्टेट बँक शाखा पाठन शाखा प्रमुखाला दिले व मागणी पूर्ण करून द्या अशी विनंती केली.मागणी एका आठवड्यात पूर्ण न झाल्यास तालुक्यातील सर्व शेतकरी व जय विदर्भ पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुदामभाऊ राठोड यांनी दिला आहे यावेळी उपस्थित सुनील राठोड, विशाल राठोड, रामेश्वर पोले उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED