श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त एकनिष्ठा कडून विविध उपक्रम

76

✒️खामगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

खामगांव(दि.20ऑगस्ट):- गौ-सेवा रक्तसेवा रुग्णसेवा मध्ये सक्रीय असलेल्या एकनिष्ठा फाऊंडेशन तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. सर्वप्रथम भगवान श्रीकृष्ण यांचे दर्शन घेऊन सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिर व तसेच फळ बिस्कीटाचे गरजु गरीब रुग्णांना वाटप करण्यात आले नंतर घाटपुरी येथील जगदंबा मातेचे दर्शन करून गौरक्षण संस्थान मधील गौ-मातेला हारफुल टाकून ढेप चाऱ्याचे भोग लावून पूजन करून भगवान श्रीकृष्ण यांची जन्माष्टमी दरवर्षी प्रमाणे या वर्षी जल्लोषात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपक खैरे है होते या उपक्रमात सुरजभैय्या यादव, दिपक खैरे, जितेंद्र मच्छरे, शेखर रिछारीया, सुनिल राऊत, सुभाष निंबाळकर, रविंद्र दिपके, अंकुश अंबुलकर, शिवम मानकर, गब्बु गुजरीवाल, शिवा वनारे, निकेतन यादव, यश शर्मा, सागर सोनोने, चेतन कदम,गजानन राऊत, प्रशांत इंगळे, अमोल नारे, सिद्धेश्वर निर्मळ, पुरुषोत्तम ठोसर, विक्की सारवान, राम अवचार, पुरुषोत्तम हरमकार, संतोष गुरेकार, ज्ञानदेव डवंगे, नितीन अंबुसकर, रवि बोंबटकर, आकाश सायखेडे, कुंदन यादव, विशाल डवंगे, सोनू ठाकूर, गोलू इंगळे, बंटी यादव, अशोक पटोले, ऋतिक खंडारे, पवन गवई, गोपाल परकाळे, अनंता मालठाणे, नितीन चरखे, महेश शिमरे, संतोष मोरखडे,किशोर भोपळे, सागर धांदू, प्रवीण फणसे, राजु देशमुख, अमरेश यादव, महादेव खंडारे, रोहीत पहुरकर, एकनाथ भोजने, महादेव माने, अमोल तायडे, विकास धांदू, यांच्यासह असंख्य सदस्यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लखन सारसर यांनी केले तर आभार ग्यानेश सेवक सर यांनी मानले अशी माहिती धनंजय गोतमारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली