दिव्यांगांसाठी राज्यात स्वातंत्र मंत्रालय स्थापना करा:-प्रहार सेवक रोशन वरठी यांची मागणी

41

✒️कारंजा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कारंजा(घाडगे)(दि.25ऑगस्ट):-यावर्षी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाले असून देशभरात यंदाच्या स्वातंत्र्य दिन हा अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला मात्र राज्यातील दिव्यांग बांधव अजूनही विविध लाभापासून वंचित आहे दिव्यांगाचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी स्वातंत्र्य दिव्यांग मंत्रालयाची गरज असून राज्यात दिव्यांग दिव्यांगाचे स्वतंत्र मंत्रालय स्थापना करावे.

अशी मागणी कारंजा (घाडगे) काजळी येथील प्रहार जनशक्ती पक्ष शाखाप्रमुख रोशन वरठी यांनी केले आहे राज्यात जवळपास 50 लाख दिव्यांग बांधव आहेत यातील बहुतांश दिव्यांगांना शासनाच्या सोयीसुविधाचा लाभ अद्यापही मिळालेला नाही याशिवाय समाजाच्या मुख्य प्रवाहात दिव्यांगांना आणण्यासाठी सरकारनें काही ठोस उपाययोजनां केलेल्या नाहीत त्यामुळे आजही हजारो दिव्यांग बांधव समाजाच्या मुख्य धारेपासुन बाहेर आहेत