मुजरा लघुपटाचा प्रीमियर शो व सम्राट नाटकाचा प्रयोग रविवारी

50

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.25ऑगस्ट):- येथिल निर्मिती फिल्म क्लब आणि शिवतेज फिल्म्स इंटरनॅशनलच्या वतीने लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी व त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी लोकसहभागातून मुजरा हा लघुपट निर्माण केला असून या लघुपटाचा प्रीमियर शो राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर येथे रविवार दि. 28 ऑगस्ट, 2022 रोजी सायं. 5:00 वा. होणार असून यावेळी ज्येष्ठ नाटककार चंद्रकांत बंडू सावंत लिखित निर्मिती फिल्म क्लब निर्मित मानव आणि निसर्ग यांचे नातेसंबध अधोरेखित करणाऱ्या सम्राट या दोन अंकी मराठी नाटकाचा नाट्य प्रयोगही होणार आहे.

मुजरा या लघुपटाचे दिग्दर्शन अनिल म्हमाने, निर्मिती डॉ. कपिल राजहंस, सह दिग्दर्शन महेश्वर तेटांबे यांनी केले असून आदित्य म्हमाने, शिवतेज राजहंस, अमिरत्न मिणचेकर, राधिका पाटील, तक्ष उराडे, नारायणी जप्तनमुलुख, आधिराज पाटील, दुर्वा राजहंस, आराध्या पोतदार, अक्षया कवर, ओम नाझरे, सानवी कांबळे, सिद्धेश कुपेकर, सिद्धिक मुजावर या बाल कलाकारांनी तर सम्राट या नाटकात राहुल काळे, सनी यळावकर, स्वरूपा बिलावर, चंद्रकांत माधळे, प्रतिभा डोंगरे, पूजा चांदणे, अरहंत मिणचेकर, रुपाली दिपक, मिहीर कुलकर्णी, प्रदीप घोलप, भरत गुरव, प्रकाश शिंगे, किशोर कांबळे, चंद्रनील सावंत या कलाकारांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. सम्राट या नाटकाचे नाटकाच्या सहनिर्माता ॲड. करुणा विमल, डॉ. दयानंद ठाणेकर तर क्रियेटिव्ह हेड डॉ. शोभा चाळके या आहेत तर डिओपी म्हणून अमर पारखे यांनी काम पाहिले आहे.

राजर्षी शाहुंना अभिवादन करण्यासाठी मुजरा या लघुपटाच्या प्रीमियर शोला व सम्राट नाट्य प्रयोगाला कला, चित्रपट व राजर्षी शाहू महाराज प्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राहुल काळे, सनी गोंधळी यांनी केले आहे.पत्रकार परिषदेला सनी येळावकर, स्वरूपा बिलावर, मिलिंद गोंधळी, मिहीर कुलकर्णी, प्रदीप घोलप, भरत गुरव, अरहंत मिणचेकर, अनुष्का माने, प्रशांत आवळे, सागर कोलप, दिग्विजय कांबळे, रोशन आजवेकर आदी उपस्थित होते.