दत्तक ग्राम राजुरा येथे राम मेघे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंटच्या रासेयो दूतांनी दिला झाडे लावा झाडे जगवाचा संदेश

27

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.25ऑगस्ट):-विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित प्रो राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा- अमरावती येथील राष्ट्रीय सेवा योजना आणि रेड रिबीन क्लब द्वारे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक २५ ऑगस्ट २०२२ रोजी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन आणि वृक्षदिंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अभियानाचे प्रचार व प्रसार करीत जनजागृती केली. सदर कार्यक्रमांतर्गत राजुरा ते टोंगलाबाद दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड आणि बीज पेरण्यात आली. सर्वप्रथम महाविद्यालयात २३ ते २७ जुलै दरम्यान अॉड. अशोक सोमवंशी आणि राजूरकर सर यांच्या मार्गर्दर्शनात उपलब्ध बीज पासून ५०० सीडबोलं तयार करण्यात आले व त्यांचे संगोपन महाविद्यालय परिसरात करण्यात आले व सादर उपक्रमाद्वारे उपलब्ध सीडबॉल आणि काही बीज असे एकत्र १५०० हुन जास्त वृक्ष लागवड आणि बीज पेरण्यात आली.

सदर कार्यक्रमाला फॉरेस्ट ऑफिस चांदूरचे श्री उमक साहेब, राजुरा येथील शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंद, राजुरा ग्राम पंचायत सदस्य व गावातील भूषण काळे, मनीष इंगोले, विनोद राजूरक, विजय पाटील, गणेशराव मारोटकर यांनी आवर्जून उपस्थिती लावत कार्यक्रमात स्वहस्ते वृक्षारोपण करून सहभाग नोंदविला.कार्यक्रमाची आखणी महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.आशिष सायवान आणि महिला रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गायत्री बहिरे यांनी सह-कार्यक्रम अधिकारी प्रा. अतुल दहाने, श्री निशांत केने तसेच १६२ रासेयो स्वयंसेवक यांच्या सहभागाने यशस्वी आयोजन केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली उप-प्राचार्य प्रा. पि व्ही खांडवे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, उपाध्यक्ष अॉड. उदयजी देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंतजी देशमुख, सचिव युवराजसिगजी चौधरी, सन्माननिय सदस्य शंकररावजी काळे, नितीनजी हिवसे, सौ. रागिनीताई देशमुख, डॉ. सौ. वैशालीताई धांडे व डॉ. सौ. पुनमताई चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या.