उमरखेड पोलीस स्टेशन व पोलीस सदनिकेचे तात्काळ लोकार्पण करण्यात यावे

27

🔸आंदोलनाचा इशारा रिपब्लिकन युवा सेना

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.26ऑगस्ट):-रिपब्लिकन युवा सेनेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय येथे एस.डी.पी.ओ. श्री प्रदीपजी पाडवी सर व उमरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री अमोलजी माळवे सर यांची भेट घेऊन पोलीस कर्मचारी तसेच तक्रारदार जनता यांच्या अडी – अडचणी मांडून निवेदन देण्यात आले.

पोलीस हाऊसिंग डिपार्टमेंट अंतर्गत झालेल्या बांधकामामध्ये 1) पोलीस स्टेशन 2) टाईप A , 3) टाईप B, 4) टाईप C असा समावेश असून तीन वर्षापासून उमरखेड पोलीस स्टेशन व पोलीस निवासस्थान इमारतीचे चाललेले बांधकाम व त्यावर कोट्यावधी रुपये खर्च करून पोलीस विभागाकरिता उभी केलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन, तीन महिने महिने उलटून गेले तरी अद्याप लोकार्पण झाले नाही.

गुन्ह्याचा तपास, वेळोवेळी येणारे विविध प्रकारचे बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था प्रश्‍न, वाहतूक नियंत्रण, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे संरक्षण, सार्वत्रिक उत्सव अशा अनेक प्रकारचा पोलीस विभागावरील कामाचा प्रचंड ताण पाहता यामध्ये कौटुंबिक जबाबदारी सांभाळून कर्तव्य पार पाडणे हे अगोदरच जिकिरीचे झाले असताना तसेच उमरखेड येथील भाडे तत्त्वावर दिले जाणारे गाळे हे मोजके असुन महागड्या स्वरूपाचे व अपुऱ्या सुविधेचे आहेत.

त्यातच ते दूरवरच्या अंतरावरचे असल्याकारणाने रात्री – अपरात्री कर्तव्यावर हजर होण्यास तसेच कर्तव्य पार पाडण्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.

कामाचा वाढता ताण, कुटुंबाची असुरक्षितता व वरिष्ठांचे आदेश पाळून कर्तव्य बजावताना त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊन आरोग्य धोक्यात आलेले दिसून येते.

कोट्यावधी रुपये खर्च करून सदर इमारतीचे बांधकाम तीन वर्षापासून चालत आले असून त्यादरम्यान सदर पोलीस स्टेशन हे इतरत्र इमारतीमध्ये हलविण्यात आले असून तेथील जागेच्या अभावामुळे अधिकारी तसेच कर्मचारी व संबंधित तक्रारदार यांची मागील तीन वर्षापासून गैरसोय होत आहे.

उमरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रामीण 04 व शहरी 04 असे 08 बिट येत असून त्यामध्ये व्यापक कार्यक्षेत येत असुन उमरखेड शहराचे अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळख असून त्यामुळे अनेक वेळा कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि सातत्याने होत असतो तसेच होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांचा विचार करिता आचारसंहिता लागल्यास लोकार्पण सोहळा रखडल्या जाईल याची नोंद घेऊन तात्काळ लोकार्पण सोहळा करण्यात यावा.

पोलीस अधीक्षक तथा पोलीस आयुक्त यांची भेट घेणार असून आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी रिपब्लिकन युवा सेनाच्या वतीने देण्यात आला.

यावेळी रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर शहराध्यक्ष, शुद्धोधन भाऊ दिवेकर, तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे, तालुका अध्यक्ष भीमराव खंदारे तालुका सहसचिव, तालुका संघटक संदीप राऊत, साहेबराव कदम, दिलीप मुनेश्वर, बबन सुर्यवंशी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.