परिवार जोडो संपर्क अभियान

33

🔹दुभंगलेल्या हजारो कुटुंबाना जोडते समुपदेशन* कौटुंबिक कलह दूर झाल्यास वाढतो स्नेह

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.26ऑगस्ट):- समाजात कौटुंबिक कलहाचे प्रकार फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पत्नी कायद्याचा गैरवापर करून कधी कायद्याचा धाक दाखवून तर कधी गजाआड करण्याची भीती निर्माण करून पतीच्या कुटुंबाला बदनाम करण्याची भीती दाखवून पती व सासरच्या मंडळींना वेटीस धरतात त्यामुळे अनेक परिवार पीडित आहेत अशा एकमेकापासून दुभंगलेले दुरावलेले परिवार कसे वाचविता येतील याकरिता चंद्रपुरातील भारतीय परिवार बचाव संघटने कडून परिवार जोडो संपर्क अभियान राबविण्यात येत आहे.

एकमेकापासून दुरावलेल्या हजारो कुटुंबांना समुपदेशनातून एकत्र आणले जात आहे भारतीय परिवार जोडो अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ नंदकिशोर मैंदळकर सुदर्शन नैताम मोहन जीवतोडे वसंता भलमे प्रदीप गोविंदवार ऍड सारिका चांदुरकर ऍड धीरज ठवसे सचिन बरबटकर नितीन चांदेकर गंगाधर गुरूनुले मोहब्बत खान डॉ राहुल विधाते सुभाष नरुले रफिक शेख पिंटू मून राजू कांबळे विनोद करमरकर स्वप्निल गावंडे विजय ठाकरे किशोर जम्पलवार स्वप्निल सूत्र पवार धम्मा दुर्गे गणेश कन्नाके निखिल निखाडे अमोल कांबळे आधी हा उपक्रम मागील काही वर्षापासून जिल्ह्यात राबवित आहे. संयुक्त कुटुंबाचा काळ अगदी आनंदात गेला आता पत्नीच्या अतिहट्टमुळे विभक्त कुटुंब पद्धती आली यात कौटुंबिक वाद पराकोटीला जात आहे अशा कुटुंबावर वडीलधाऱ्याचा धाक राहिला नाही सासू-सासरे घरात नको फोटो पुरते असावेत असा पत्नीचा आग्रह पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून बरीच कुटुंबे विनाशाकडे जात आहेत असे निरीक्षण डॉ नंदकिशोर मैंदळकर यांनी नोंदविले कौटुंबिक वादात सासर व माहेर दोन्ही अधोगतीला जात आहे.

पुरुषांच्या मातापित्या ला आत्महत्या वा वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येत आहे पत्नीला तिचे आई-वडील आवडतात पण सासू-ससरे नकोत हा कुठला न्याय? कुटुंबात वाद होणे तसेच पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होण्यासाठी मोबाईल मुख्य भूमी वटवतात तसेच मुलीच्या संसारात आई-वडिलांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे अनेक दांपत्य कुटुंब उध्वस्त होताना दिसते माहेरच्या व मोबाईलच्या अति मोहामुळे घटस्फोट व पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.

पत्नी स्वतःचे पाप दुष्कृत्य लपविण्याकरिता पति सासर मंडळींवर आपण समाजात चर्चा सुद्धा करू शकत नाही असे खोटे घाणेरडे आरोप लावून त्यांना जगणे कठीण करीत आहे NCR
B नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो नुसार 92 हजार पत्नीपीडित पुरुष दरवर्षी आत्महत्या करतात असेच घडत राहिल्यास कुटुंब व्यवस्था ढासळणार नाही काय? पुरुषांचा विवाह संस्थेवर विश्वास राहिला नाही आज लग्न करायचे एका महिन्यात हुंडाबळीचा धाक दाखवून घटस्फोट घेण्यासाठी पैशाची अवाढव्य मागणी करून पुरुषांना ब्लॅकमेल करणे सुरू आहे.

पुरुषांनो सावधान व्हा लाजू नका आपली तक्रार नोंदवा समाज व कुटुंबाचे नुकसान होऊ नये याकरिता पती-पत्नी सासर माहेर यांच्यात कसा समन्वय घडवून आणता येईल दोन्ही पक्षाचे समुपदेशन करून परिवारात स्नेह व आनंद निर्माण व्हावा याकरिता भारतीय परिवार बचाव संघटने कडून परिवार जोडो संपर्क अभियान राबविण्यात येत आहे घरातील भांडणामुळे भाऊ वहिनी बहीण भाऊजी आई-वडील ननद भावजय कुटुंबात मधुर संबंध व्हावेत. बायकांनो नवऱ्याला, सासू-सासऱ्यांनो जावयाला सरळ करू त्याला जेलमध्ये टाकू त्याची जागा त्याला दाखवून देऊ या भ्रामक अविर्भावात राहू नका आता जावई उदंड झाले आहेत . कौटुंबिक कलह दूर झाल्यास स्नेह वाढतो यावर आमच्या संघटनेचा विश्वास आहे .