महावितरणचा गरीबांवर अन्याय-तुम्ही मते द्या,आम्ही बरोबर करू!

25

🔸वायरमन ची हिटलर स्टाईल

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्वत्र ग्रामिण भागातील खेडेगावात महावितरणची पठाणी वसुली सुरु आहे, या वसुली मुळे गोर गरीबांना नाहक त्रास सहण करावा लागत आहे आदिच पावसांच्या अतिवुष्टीमुळे रोजगार नाही गरीबांच्या हाताला काम नाही.अशातच महावितरणचे १दोन महिन्याचे थकबाकी झाले आहे.महावितरणच्या धोरणामुळे हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीबावर अन्याय होत असल्याचे चित्र दिसुन येत आहे गावागावात कार्यरत असलेले वायरमन ग्राहकांच्या घरी थकबाकी वसुली करण्यासाठी जात असताना बेरोजगारी नसल्याने एक दोन दिवसांची हात जोडुन विनंती केली जाते.

परंतु *हिटलर स्टाईल* चे वायरमन लाईन कापुन जातात.आधीच पावसाच्या अतीवुष्टीमुळे शेकडो एक्कर जमीन पाण्यात असुन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.त्याच बरोबर भुमिहीन वर्ग मजदुर सापडला आहे.आता आजाराचे सकंट गोरगरीबावर आले आहे.लाईट हि अत्यंत गरजेची झालेली असल्याने ती लाईट घरात नसली तर मुलाबाळांचे कसे काय होईल या चिंतेत व्याजाने उसनवाडी पैसे आणुन काम करावे लागत आहे हे चित्र येनस या गावातील चित्र दिसत आहे.

वायरमण यांच्या मुजोरीला गावातील नागरीक तसेच शेतकरी त्रस्त आहे.ग्राहक विनंती करुनही मुजोर खोर वायरमन त्यांचं अयकुनही घेत नाही.एकामहिण्याचे बिलही थकीत नसले पाहिजेन त्या करीता कुर्तता दाखवत वसुली करत आहे.हा त्याचा ही दोष नसुन महावितरण मधील राणबोक्यामुळे असावा अशी ही चर्चा चौकाचौकात आहे.गेल्या चार ते सहा महिन्यापासुन कानस शेत शिवारातील लाईन बंद आहे ..लाईन मुळे शेतातील पिके नष्ट होत आहे या कडे लक्ष न देता ..घरगुती लाईन वर जोर आहे..म्हणुन मते मागणारे येवुन गेले. काही नागरीकांनी आपल्या लाडक्या उमेदवारांना आशेअभावी मते ही दिली.पण ते आता कुठे आहे..ही चर्चा जोर धरत आहे.म्हणुन लोकप्रतिनिधी यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.