कारंजा येथे संत सेनाजी महाराज जयंती साजरी

34

🔸नाभिक समाज सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचे आयोजन.

✒️कारंजा घाडगे,प्रतिनिधी(पियूष रेवतकर)

कारंजा(घा)(दि.29ऑगस्ट):- वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे दिनांक २७/८/२०२२ रोज मंगळवारला कारंजा घाडगे येथील नाभिक समाज सलून ब्युटी पार्लर असोसिएशन च्या वतीने श्री. संत सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.श्री. सेनाजी महाराज हे एक मराठी वारकरी असून त्यांना ज्ञानदेव नामदेवांच्या परिवारातील मानले जाते. मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये त्यांचा जन्म झाला व त्यांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा होता. सर्वप्रथम सेनाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी सेनाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली.

पुण्यतिथी साजरी करण्याच्या निमित्त वर्धा जिल्हा कारंजा सर्कल प्रमुख सुरेशराव चौधरी,कारंजा तालुका अध्यक्ष संकेत बानाईतकर, उपाध्यक्ष नितीन चौधरी, उपाध्यक्ष सागर बानाईतकर, सचिव भूषण वाटकर, कार्याध्यक्ष उमेशराव द्रव्यकार, उपसंपर्क प्रमुख छत्रपती चौधरी,प्रमुख मोनोहरराव चौधरी, राजुभाऊ वाटकर, प्रविनभाऊ नागतुरे व इतर लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.