महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा !…

34

🔹मेजर ध्यानचंद हे हॉकीचे जादूगर – क्रीडाशिक्षक एच.डी.माळी.

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी पाटील)

धरणगांव(दि.29ऑगस्ट):- – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचर यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.सांस्कृतिक विभाग प्रमुख एस एन कोळी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस. पवार सर होते. मान्यवरांच्या हस्ते हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. क्रीडाशिक्षक एच.डी. माळी यांनी मेजर ध्यानचंद यांचा जीवनपट सांगून भारतासाठी त्यांनी ऑलम्पिक मध्ये सलग तीनदा सुवर्णपदक मिळवले. आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे. विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी पुढच्या वर्षी आपल्या शाळेमध्ये हॉकीच्या बारा स्टिक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊ. व सुंदर हॉकीची टीम तयार करून असे आश्वासन दिले व राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर हॉलीबॉल च्या संघांची मॅच मैदानावर लावण्यात आली. यामध्ये दहावीचा संघ विजयी झाला. विजय संघाला शाळेकडून बक्षीस देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एन. कोळी तर आभार पी.डी.पाटील यांनी मानले.