अण्णाभाऊंच्या साहित्यातील तत्वज्ञान वैज्ञानिक कसोटीवर खरे – प्रा. भुयारे

28

✒️नांदेड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नांदेड(दि.30ऑगस्ट):- नांदेड शहरातील ओंकारेश्वरनगर येथे साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती निमित्य अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि चळवळीतील तत्वज्ञान या विषयावर सुप्रसिध्द पुरोगामी विचारवंत कॉ.प्रा.सदाशिव भुयारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. मान्यवरांचे शाल व पुष्पहारांनी स्वागत करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा.सदाशिव भुयारे पुढे असे म्हणाले की,अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वैज्ञानिक कसोटीवर खरे उतरणारे आहे.अण्णाभाऊ साठे यांनी ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिक कष्टकरी यांच्या तळहातावर तरलेली आहे. हा पृथ्वीच्या निर्मितीचा सिद्धांत मांडून सन बाराशे वर्षापूर्वी विष्णूने पृथ्वीच्या उत्पतीच्या मांडलेल्या काल्पनिक वैदिक सिध्दांताला अण्णाभाऊ साठे यांनी छेद दिला आहे. मला लढा मान्य आहे, रडगाणे नाही हा लोकशाही क्रांतीचा नारा देऊन अण्णाभाऊंनी भारतातील युवक युवतींनी येथील जातीय,धर्मांध व भांडवली व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारण्याचे आहवान केले आहे. यह आजादी झूठी है,देश की जनता भुकी है | हा सिद्धांत मांडून अण्णाभाऊ साठे यांनी भारतातील आर्थिक विषमता, दारिद्र्य,प्रचंड बेरोजगारी या बाबींचे वैज्ञानिक कसोटीवर विश्लेषण केले आहे. सापळा या कथेतून व आवडी या कादंबरीतून अण्णाभाऊंनी जाती अंताचे वैज्ञानिक तत्वज्ञान मांडले.

चित्रा, वैजयंता या कादंबऱ्यातून अण्णा भाऊंनी वास्तविक स्त्रीवादी तत्वज्ञान मांडले असे प्रतिपादन प्रा.सदाशिव भुयारे यांनी केले आहे. कार्यक्रमास नगरसेविका सौ.ज्योतीताई कल्याणकर,सौ.सुनंदा पाटील,बालाजी गजले,कॉ.प्रा.इरवंत सुर्यकार,ॲड.विष्णू गोडबोले,कॉ.प्रा.राज सुर्यवंशी,कॉ.स्वाती दीपक बांगड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संयोजन समितीचे अध्यक्ष बाबुराव बसवंते हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गजानन काळे,जयवंत केंद्रे,सचिन कल्याणकर हे उपस्थित होते सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समितीचे दत्ता सोनटक्के,अमरनाथ नामवाड (महाराज),कुलदिप सुर्यवंशी,पांडुरंग भरांडे,माधव जोगदंड,शंकर नामवाड, भिमराव जाधव,सुभाष सोनटक्के, शिवानंद जांभळे,डी.टी.सुर्यवंशी, निलेष वाघमारे,हाणमंत गवाले, डी.एन.ननुरे,राजकुमार सुर्यवंशी,संजय जांभळे,शिवाजी वाघमारे, नरसिंग भालेराव,बालचंद्र सोनटक्के,भिमराव डोके,शंकर कंधारे,चंद्रकांत भाग्यवंत,मोकींद वाघमारे,किशोर सोनटक्के,श्रीकांत सोनटक्के,सखाराम बसवंते,किशनराव बसवंते,चुडामन सोनटक्के,दिनाजी सोनटक्के,केशव सोनटक्के,अभिजित साबळे,बबन वाघमारे,विजय कंधारे,सचिन वाघमारे,भगवान जाधव,गंगाधर बसवंते,पंजाबराव रनखांब,गोविंद बसवंते,विनोद वाघमारे यासह आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले व अध्यक्षीय समारोप बाबुराव बसवंते यांनी केले .