“सभासद हा खऱ्या अर्थाने बँकेचा मालक असल्यामुळे सभासदहितासाठी आता सभासदांची जाणीवजागृती होणे आवश्यक आहे. – श्री.नंदकिशोर गायकवाड(अध्यक्ष रयत सेवक मित्र मंडळ,सातारा)

25

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे (हडपसर) – दि. 28/08/2022 वार – रविवार रोजी दि रयत सेवक को-ऑप. बँक लि. सातारा सन 2022 ते 2027 होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारासाठी *रयत सेवक मित्र मंडळ, सातारा* संघटना पुरस्कृत *रयत मित्र मंडळ पॅनलचा* प्रचार मेळावा हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस.एम. जोशी कॉलेज येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या मेळाव्याच्या सुरुवातीला *रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, आपल्या सर्वांचे दैवत पद्मभूषण, डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माउली सौ.लक्ष्मीबाई पाटील व थोर स्वातंत्र्य सेनानी एस. एम. जोशी* यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या प्रचार मेळाव्याचे अध्यक्ष *दि.रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी व्हाईस चेअरमन मा. श्री. एम. आर. आर्बुने* हे होते. या मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक *श्री.तुकाराम शिंगाडे (बापू), श्री.अनिल पाटील (माजी प्राचार्य), श्री.जी.आर.गायकवाड (माजी मुख्याध्यापक), बोरगांव विद्यालयाचे प्राचार्य श्री. खंडू कांबळे (उपाध्यक्ष), मुख्याध्यापक सोमनाथ मरभळ सर, महिला आघाडी प्रमुख श्रीमती आशालता मॅडम, पुणे जिल्हाध्यक्ष संजय कोकणे सर, सांगली जिल्ह्याचे संघटनेचे अध्यक्ष गजानन माळी सर, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री.दिलीप तुपे सर आणि प्रमुख वक्ते, संघटनेचा बुलंद आवाज श्री. नंदकिशोर गायकवाड सर (अध्यक्ष) तसेच रयत मित्र मंडळ पॅनलचे सर्व 17 उमेदवार व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील रयत सेवक मित्र मोठ्या संख्येने या मेळाव्यासाठी उपस्थित होते.*

या मेळाव्यात सुरुवातीलाच *आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकासंबंधी केलेल्या वक्तव्याचा निषेध ठराव सर्वांनुमते मंजूर करण्यात आला.* शिक्षकांना मिळणारा HRA हा वेतनाचाच भाग असून 2016 सालीच मुख्यालयी राहण्याची सक्ती नसल्याचे पत्र शासनाने काढले असताना जाणीवपूर्वक शिक्षकांबद्दल अशा प्रकारची वक्तव्ये करून आपण शिक्षकांचे नव्हे; तर समाजाचे खच्चीकरण करतोय, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक संघटनेचे संघटक *श्री.दीपक भोये सर* यांनी केले. या प्रास्तविकातून त्यांनी मागील सहा महिन्यात *संवाद दौऱ्याच्या माध्यमातून रयत बँकेच्या सभासदांची जाणीवजागृती करण्याचे काम मित्र मंडळाने केले असून बँक निवडणूक ही साध्य नसून सेवक हिताचे साधन आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. रयत बँकेत आता परिवर्तन अटळ आहे.* याचे साक्षीदार बनण्यापेक्षा या बदलाचे भागीदार व्हावे, असे मत व्यक्त केले.

त्यानंतर या प्रचार मेळाव्यामध्ये रयत शिक्षण संस्थेतील उपक्रमशील व गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या प्रचार मेळाव्याला उपस्थित असणारे मान्यवर *श्री.अनिल पाटील* यांनी रयत सेवक मित्र मंडळाने प्रचारात आघाडी घेतली आहे, रयत सेवक “मित्र मंडळाच्याच” बाजूने आहे, त्यामुळे रयत बँक निवडणुकीत रयत मित्र पॅनलला 100% यश मिळणार आहे. असे प्रतिपादन केले. रयत बँकेचे माजी व्हाईस चेअरमन *श्री.शिंगाडे बापू* यांनी अकरा कोटीचा घोटाळा करणाऱ्या संचालकांना सभासद त्यांची जागा दाखवून देतील व रयत मित्र मंडळ पॅनलच्या घड्याळाच्या बाजूने उभे राहतील. असे मनोगत व्यक्त केले. उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून *श्री.बाळासाहेब जगताप* यांनी रयत मित्र मंडळ पॅनलला रयत सेवकांचा प्रचंड असा पाठिंबा मिळत आहे, रयत सेवक “मित्र मंडळ पॅनलच्या” उमेदवारांचे उत्साहाने व आपुलकीने स्वागत करत आहेत. रयत सेवक मित्र मंडळ पॅनलचा जाहीरनामा हा सर्व रयत सेवकांचा जिव्हाळ्याचा व आपलेपणाचा विषय झाला आहे, असे मनोगत व्यक्त केले.

महिला राखीव उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या *श्रीमती ज्योत्स्ना बाळसराफ* यांनी केवळ महिलांसाठी राखीव जागा आहेत, म्हणून निवडणूक प्रक्रियेत महिलांना स्थान मिळते. मात्र आज परिस्थिती बदलली असून सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्यामुळे याही निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान महिला सभासदांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून पुढील कार्यकाळात कारभार करत असताना महिलांनाही विचारात घेणे, काळाची गरज असल्याची भूमिका मांडली.

या मेळाव्यात सर्व उमेदवारांनी आपापला परिचय करून दिला. निवडणूक बिनविरोध होऊ नये आणि सभासदांना त्यांचा मतदानाचा अधिकार मिळावा, हा सभासदांना दिलेला शब्द पाळण्यासाठीच आम्ही निवडणूक लढवत असून यापुढे केवळ आणि केवळ सभासद हित डोळ्यांसमोर ठेवूनच कारभार करू, अशी भूमिका घेतली.

रयत सेवक मित्रमंडळ संघटनेचे अध्यक्ष मा. *श्री नंदकिशोर गायकवाड* यांनी आपल्या मनोगतातून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. आतापर्यंत साक्षरता, संगणक साक्षरता आली, आता सभासदांची बँकेची साक्षरता होणे आवश्यक आहे. दूधात पाणी खपवून पाण्यावर लोणी काढण्याची गोष्ट राजकारणात नवीन नाही. मात्र बँकेत तर सभासदांना अंधारात ठेवून गोपनियतेच्या नावाखाली सगळा व्यभिचार चालला असल्याची परखड टिका केली. कोणाला लाईफ वर्कर व्हायचे असते, कोणाला लाईफ मेंबर, पदाधिकारी व्हायचे असते. अशावेळी बँकेच्या संचालक पदाचा वापर शिडीप्रमाणे करून पुढे जाण्याची प्रवृत्ती निर्माण होत आहे. तुम्हांला बँकेचा कारभार करण्यासाठी कारभारी म्हणून नेमले आहे, तुम्ही मालक होऊन मनमानी करण्यापेक्षा सभासदांचे हित डोक्यात घेऊन अभ्यासपूर्ण योजना आणल्या पाहिजेत. दुर्दैवाने या निवडणुकीत एकमेकांवर टिका करण्यातच उमेदवार व्यस्त दिसतात. पुढील पाच वर्षांत तुम्ही काय करणार, याची सभासदांना अपेक्षा आहे. आज संस्था प्रशासन निवडणूक प्रक्रियेत तटस्थ असताना काही आजीमाजी पदाधिकारी निवडणुकीत एवढा इंटरेस्ट का घेतात, ही गोष्ट सभासदांना कळली पाहिजे. बँकेच्या कारभारात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभागी करून घेतले पाहिजे. ऑनलाईन बँकिंग, मेडिक्लेम, इन्शुरन्स, कमी आणि स्थिर व्याजदर,15% लाभांश, मयत सभासदांना 100% कर्जमाफी, सेवानिवृत्त सभासदांना ठेवींवर 1% अधिक व्याज, सभासदांच्या सुख दुःखात सहभाग व आपलेपणाची व सन्मानाची भावना, ग्राहक सेवा केंद्र, इत्यादी मुद्दे मांडून संघटनेची भूमिका स्पष्ट केली. *खोटी आश्वासने आणि भूलथापा मारून निवडणूक जिंकता येते. मात्र योग्य कारभार करण्यासाठी सत्यच उपयुक्त ठरते. “आमच्या डोक्यावर फक्त कर्मवीरांचा हात आणि सर्वसामान्य रयत सेवकांची साथ आहे”* तेवढेच आम्हांला पुरेसे आहे. हे आवर्जून सांगितले.

अध्यक्षीय भाषणात दि.रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी व्हाईस चेअरमन *मा. श्री. एम. आर. आर्बुने* यांनी वेगवेगळ्या संघटना कर्मवीरांचे आणि संस्था प्रशासनाचे नाव घेऊन निवडणूक लढवत आहेत. मात्र रयत सेवक मित्र मंडळ ही एकमेव संघटना कर्मवीर अण्णांच्या विचारांचा वारसा घेऊनच चालत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात ही संघटना बँकेमध्ये आण्णांचे विचार बँकेच्या प्रशासनात रुजविण्याचे काम करेल. आधुनिक काळात ऑनलाईन बँकिंग हाच पर्याय असून बदलत्या काळानुसार आता आपल्यालाही बदलावे लागेल, मित्र मंडळाचे हे तरूण तडफदार शिलेदारच हे करू शकतात. हा आशावाद व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *श्री.राम जाधव सर व श्री. बालाजी बोंबडे सर* यांनी केले. प्रचार मेळाव्याचे आभार *डॉ. धनंजय कच्छवे* यांनी मानले. या प्रचार मेळाव्यासाठी सभागृह उपलब्ध करून देणारे एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य व उपप्राचार्य यांचे विशेष आभार.

*’पुणे तिथे काय उणे’ या म्हणीप्रमाणे या मेळाव्याला जमलेल्या सर्व रयत सेवकांनी आजपर्यंत पुण्यात फक्त घड्याळच चालते. याही निवडणुकीत रयत मित्रमंडळाच्या पाठीशी ठाम उभा राहण्याचा व बहुमताने सर्व 17 उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धार केला.*
⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

या प्रचार मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या सर्व रयत सेवकांचे तसेच या प्रचार मेळाव्याचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल पुणे जिल्हा कार्यकारिणीचे संघटनेच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक हार्दिक आभार…