पंचायत समिती पवनी अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन

33

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.31ऑगस्ट):-पवनी तालुक्यातील मोहरी, ब्रम्ही, मोखारा, कोेदुर्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती विकास योजना तथा खासदार प्रफुल पटेल यांच्या स्थानिक निधीतून तथा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत समाज मंदिर आणि रस्त्याचे भूमिपूजन श्री विजय सावरबांधे माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या शुभहस्ते पार पडले.

प्रमुख अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती डॉ. सौ. नूतन विलास कुर्झेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री विवेकानंद कूर्झेकर, पंचायत समिती सदस्य शेखर पडोळे, स्मिता गिरी,सुवर्णा रामटेके, मोखारा येथील सरपंच सौ प्रीती ताई जितू नखाते तसेच हेमंत मेनवाडे, पिंकू पाटील सेलोकर, जितू नखाते, पप्पू नखाते, यशवंत लांजेवार,लहुजी कुर्झेकर व संबंधित गावातील प्रमुख सरपंच, सदस्य आणि राष्ट्रवादी पक्षाचे अनेक कार्यकर्ते या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाले.