26 लाखांचा 265 किलो गांजा जप्त,दोन जण ताब्यात

✒️वर्धा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वर्धा(दि.3सप्टेंबर):- कारमधून नेत असलेला तब्बल 265 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत 26 लाख 50 हजार रुपये आहे. नागपूर- अमरावती महामार्गावर कारंजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोरगाव (ढोले) फाटा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या चमून केली आहे.

मिळालेल्या माहितीवरून वर्ध्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या चमून नागपुर– अमरावती महामार्गावर बोरगाव (ढोले) फाटा येथे सापळा रचला. छापा टाकला असता कारच्या मागील सीटमध्ये बॉक्स करून त्यात व डिक्कीमध्ये गांजा आढळला. पोलिसांनी कार तसेच 26 लाख 53 हजारांचा 265 किलो गांजा जप्त केला. पोलिसांनी गांजा, कार, मोबाईल असा 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेत कारंजा पोलिसांच्या स्वाधीन केले.

Breaking News, क्राईम खबर , लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED