उद्या पाच सप्टेंबरला “म.फुले-आंबेडकरांचे शैक्षणिक विचार कार्य व योगदान” ह्या विषयावर शरद शेजवळ यांच्या व्याख्यानाचे आयोजन

29

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.4सप्टेंबर):-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांचे शासकीय निवासी शाळा बाभूळगाव तालुका येवला येथे दिनांक ५ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २ वा. अध्यापकभारती तथा लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान संस्थापक प्रा. शरद शेजवळ यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मुख्याध्यापक रामनाथ होंडे सर यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मा.आयुक्त समाज कल्याण पुणे, मा. प्रादेशिक उपायुक्त नाशिक विभाग नाशिक व मा सहा आयुक्त समाज कल्याण नाशिक यांच्या सुचनेनुसार विद्यार्थी ज्ञानवर्धन व माहितीसाठी देशातील सामाजिक सुधारणा तथा शैक्षणिक विचार कार्यात अतुलनीय योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांना शैक्षणिक अध्ययन अभ्यासात रुची निर्माण व्हावी याकरता आदर्शवत महापुरुष व महिलांच्या शैक्षणिक कार्य व योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना करून देण्याच्या हेतूने सदर व्याख्यानाच्या आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील आहेत.