बीडचे शशिकांत कुलथे, सोमनाथ वाळके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

28

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.5सप्टेंबर):-राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दिल्ली येथे वर्ष २०२२ चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील दामू नाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ वाळके यांना यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.