गेवराई तालुक्यातील शोकडो निराधार शासनाच्या योजनेपासून आजही वंचित !

59

✒️बीड जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.5सप्टेंबर):-महाराष्ट्र राज्यात मागिल काही दिवसात संगित खुर्ची खेळल्या प्रमाणे सरकार येतं आणी जातं.यामधे सर्वाधिक अडचणी ह्या तहसील अंतर्गत आसलेल्या निराधार समितीत होऊ लागल्या आहेत.यामधे संजय गांधी,राजीव गांधी व अन्य योजनेत मागिल काही महिन्यांपासून नियमीत निराधार प्रश्नी बैठका होत नसल्याने गेवराई तालुक्यातील निराधार व लाभार्थांच्या अडचणीत सध्या वाढ होऊ लागली आहे.राज्यातील सरकार बदले माञ आजही गेवराई तालुक्यात शोकडो लाभार्थी शासनाच्या विविध योजनेपासून वंचित आहे.तहसील कार्यालयात निराधार प्रश्नी नियमीत बैठका होत नसल्याने परिणामी अवमेळ होऊ लागला आहे.सरकार कुणाचे व कमिट्या कुणाच्या असा प्रश्न निराधांर लोकांना सध्या पडला आहे.त्यामुळे गेवराई तालुक्यातील शोकडो नागरिक शासनाच्या विविध योजने पासून वंचित असुन या लोकांना शिंदे फडणवीस सरकार न्याय देईल ? असा प्रश्न रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर यांनी केला आहे.

गेवराई तहसील कार्यालयात निराधार व शासनाच्या विविध योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थी व निराधार प्रश्नी नियमीत बैठका होत नसल्याने कुणाचेच कुणावर नियञंण नसल्याचे दिसून येत आहे.परिणामी तालुक्यातील शोकडो निराधार आजही शासनाच्या विविध योजनेपासून वंचित आहे.राज्यात नुकतेच सत्ता परिवर्तन झाले,शिंदे फडणवीस सरकार आले असुन या सरकारकडून गेवराई तालुक्यातील निराधारांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी आशा पल्लवित झाल्या आहे.गेवराई तहसील कार्यालयात नियमीत निराधार प्रश्नी बैठका का घेतल्या जात नाही असा प्रश्न रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर यांनी उपस्थित केला आहे.बैठका नियमीत होत नसल्याने कुणाचेच कुणावर नियञंण राहिले नसुन अवमेळ होऊ लागला आहे.सरकार कुणाचे,कमिट्या कुणाचे,अध्यक्ष कोण,सदस्य कोण,प्रमुख कोण असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आसताना याचा फटका शासनाच्या विविध योजनेपासून वंचित आसलेल्या निराधारांना सध्या बसू लागला आहे.गेवराई तहसील अंतर्गत निराधारांना आपले नाव यादीत आले की नाही यासाठी महिणो महिणे तहसीलला खेटे मारण्याची वेळ आली आहे.

गेवराई तालुक्यातील निराधारांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी मागिल अनेक वर्षांपासून आमचा शासन स्तरावर हमखास पाठपुरावा असुन यापुडे देखील निराधारांना न्याय देण्यासाठी लढा कायम राहणार आहे.निवेदने,मोर्चे,उपोषण व अन्य अंदोलने आजवर केली आहे. तहसील प्रशासन निराधारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नियमीत बैठका का घेत नाहीत यासाठी आता आम्ही अंदोलने करणार आहे.तसेच या अंदोलनाच्या माध्यमातून जिल्हा व तालुका प्रशासनाला सवाल करुन आपन नियमीत निराधारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नियमीत बैठका का घेत नाहीत याचा जवाब विचारणार असल्याचे रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर यांनी सांगितले.