वाढदिवसाचा खर्च टाळुन कृषीकांता आदिवासी अनाथ आश्रमास किराणा स्वरुपाची मदत

✒️मनोहर गोरगल्ले(पुणे,जिल्हा प्रतिनिधी)

राजगुरुनगर(दि.१२सप्टेंबर):-राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक आदरणीय श्री.जि.रं.शिंदे गुरुजी यांचे चिरंजीव आमचे बालपणापासुनचे अगदी जवळचे स्नेही श्री.जयदीप जिजाराम शिंदे यांनी त्यांच्या वाढदिवसाचा अनाठायी होनारा सर्व खर्च टाळुन त्या रक्कमेतुन कुरवंडी येथील कृषीकांता आदिवासी शिक्षनसंस्था अनाथ, निराधार ,मुलांचे आश्रम या सामाजिक संस्थेस तब्बल ४ हजार रुपयांचा किराणा भेट दिला. व त्या लहान निरागस मुलांच्या जेवनाचा एक महिन्याचा प्रश्न मार्गी लागला.

श्री.जयदीप शिंदे हे कायमच वाढदिवसाचा खर्च टाळुन सामाजिक उपक्रम राबवित असतात. यावेळी सामाजिक कार्यकर्ते कैलास दुधाळे मनोहर गोरगल्ले यांच्या विनंतीवरुन त्यांनी किराणा स्वरुपातली मदत ही आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी येथील सविता मते मॅडम चालवित असलेल्या कृषीकांता आदिवासी शिक्षन संस्था अनाथ निराधार आश्रमास भेट दिली. यावेळी दाते श्री.जयदीप शिंदे सामाजिक कार्यकर्ते कैलास दुधाळे आणि मनोहर गोरगल्ले यांचे आभार सविता मते मॅडम यांनी व्यक्त केले

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED