मोफत बस सेवेबाबत काय म्हणतात ज्येष्ठ नागरिक? पाहा स्पेशल रिपोर्ट

97

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.14सप्टेंबर):-देशभरात 75 वा आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यक्रम तसेच योजना देखील राबवण्यात जात आहेत. राज्य महामार्ग परिवहन मंडळाने (MSRTC) देखील 75 वर्षावरील ज्येष्ठांसाठी एक नवीन योजना राबविली. या योजनेअंतर्गत 75 वर्षांवरील नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवासी सेवा सुरू करण्यात आली. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. वाट पाहीन पण एसटीने जाईल हे ब्रीदवाक्य आपण बस स्थानक परिसरात ऐकले असेल. मात्र, आता हे वाक्य ज्याप्रमाणे बोलले जाते त्याचप्रमाणे बस स्थानक परिसरात नागरिकांची प्रवासासाठीची गर्दी वाढल्याचे चित्र आहे.

या सेवेचा प्रारंभ दिनांक 27 ऑगस्ट रोजी करण्यात आला. एसटी महामंडळाच्या बीड विभागातून गेल्या 10 दिवसात 75 वर्षे वयोगटावरील अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेद्वारे 8 हजार पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटी बसमधून मोफत प्रवास केला आहे. मोफत प्रवासामुळे ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. एसटीतून प्रवासाला प्राधान्यएसटी महामंडळाची लालपरी ही ग्रामीण भागाची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते.

शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठापर्यंत लालपरी सर्वांना आपल्या ठिकाणापर्यंत पोहचवते. एसटी प्रवास सुरक्षित असतो यामुळेच ज्येष्ठ नागरिक एसटीतून प्रवासाला प्राधान्य देतात. एसटीतर्फे 65 वर्ष पूर्ण झालेल्यांना अर्धा तिकिटाच्या रकमेत प्रवास होता. आता अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत 75 वर्षीय ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमध्ये मोफत प्रवास सवलत देण्यात आली आहे.ज्येष्ठांची शहराकडे रेलचेलग्रामीण भागात आजही पाहिजे तितक्या सुविधा उपलब्ध नाहीत.

ग्रामीण भागातील नागरिक कुठल्या ना कुठल्या कारणास्तव शहरात जातात. मग शेती कामे असो किंवा दवाखाना. मात्र आता ज्येष्ठ नागरिकांना एसटी मार्फत मोफत प्रवास सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांची शहराकडे अनेक कामानिमित्त रेलचेल वाढली आहे.

सर्वाधिक लाभधारक या आगारातसर्वाधिक लाभधारक हे बीड येथील मुख्य बस स्थानक येथून प्रवास करतात.

प्रतिदिवशी 1200 ते 1500 ज्येष्ठ नागरिक मुख्य बस स्थानक बीड येथून प्रवास करत आहेत. माजलगाव, अंबाजोगाई, गेवराई, या आगारातून प्रतिदिवशी 800 ते 900 ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात.

ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसादएसटी परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या मोफत बससेवेला ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भविष्यामध्ये आणखीन चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. एसटीचा प्रवास हा सुरक्षित आहे.

आता ज्येष्ठांसाठी मोफत देखील असल्याने याचा अधिक लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी केले आहे.ही चांगली योजनामागील अनेक दिवसापासून राज्यातील धार्मिक महत्त्व असणाऱ्या देवस्थानाला जात असतो. त्यावेळी मला हाफ तिकीट होते. मात्र, राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आता मोफत प्रवास सुरू केला आहे. ही चांगली योजना आहे. आता आमचा मोफत आणि सुरक्षित प्रवास होत असल्याचे प्रवासी एकनाथ काशीद यांनी सांगितले.