कौशल्य विकास विभागातर्फे नव उद्योजकाबाबत समुपदेशन सत्राचे आयोजन

31

🔹जिल्ह्यातील नव उद्योजकांना लाभ घेण्याचे आवाहन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.15सप्टेंबर):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे “उद्योजक कसे व्हाल आणि नवीन उद्योजकात मानसिकता कशी निर्माण व्हावी” या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येत आहे.

सदर मार्गदर्शन सत्राचे आयोजन दि. 23 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1 ते 2 वाजताच्या कालावधीत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, पहिला माळा, हॉल क्रमांक 5 व 6, चंद्रपूर येथे करण्यात आले आहे. वरील विषयावर उद्योजकीय मार्गदर्शक शशिकांत मोकाशे हे मार्गदर्शन करणार आहेत.

या समुपदेशन सत्राचा ऑनलाईन लाभ घेण्याकरिता meet.google.com/mfc-wwug-eez या लिंकचा वापर करावा. अधिक माहितीकरीता कार्यालयाच्या 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. नव उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील सर्व बेरोजगार युवकांनी या सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.