ने. ही. विद्यालय नवेगाव पांडव येथे हिंदी दिवस साजरा

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.15सप्टेंबर):-भारतभर 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो.त्याच दिवसाचे औचित्य साधून ने ही विद्यालय नवेगाव पांडव येथे भाषण स्पर्धा व हिंदी कविता गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पि.एस.ठाकरे सर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर विद्यालयातील हिंदी शिक्षक श्री. एन. बी. चुऱ्हे सर व इंग्रजी शिक्षक श्री. एम. आर.कुथे सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. हिंदी दिवसाच्या निमित्ताने जवळपास 30 स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला. विद्यार्थी भाषणानंतर प्रमुख अतिथी असलेले श्री.एन. बी. चुऱ्हे सर यांनी हिंदी भाषेचा इतिहास विद्यार्थ्याना समजावून सांगितला व हिंदी भाषेचे महत्व पटवून दिले. सदर भाषणानंतर प्रमुख अतिथीश्री. एम. आर.कुथे यांनी इंग्रजीप्रमाणे हिंदी भाषा सुध्दा महत्वाची आहे असे प्रतिपादन केले.त्यानंतर अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पि एस ठाकरे यांनी भाषा हे माणसांना जोडण्याचे साधन असून आपल्या विस्तृत देशाला खऱ्या अर्थाने हिंदी भाषेने जोडून ठेवले आहे असे सांगितले.

या संपुर्ण सपर्धेचे मूल्यमापन व बक्षीस वितरण संचलन श्री.सतिश डांगे सर यांनी केले . अध्यक्षीय भाषणानंतर लगेच विद्यार्थ्याना प्रथम , द्वितीय व तृतीय असे बक्षीस देवून गौरवण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमांचे संचालन वर्ग 10 ची विद्यार्थिनी फाल्गुनी भोयर हिने केले.या कार्यक्रमाला विद्यालयाचे शिक्षक श्री.ललित महाजन सर,श्री वी. के. बेदरे सर,श्री. रेवणाथ ठवरे सर, कू.माधवी कुळे मॅडम,श्री. एम.आर. हमके सर,शिपाई बंडू फुकट ,क्लार्क शांताराम निकुरे आदी कर्मचारी उपस्थीत होते.