श्रीमती प्रतिभाताई वाघ यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

33

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)

दोंडाईचा(दि.16सप्टेंबर):-येथील ज्ञानोपासक शिक्षण मंडळ संचलित, शिंदखेडा तालुक्यातील, तावखेडा येथील, महर्षी वाल्मिक माध्यमिक विद्यालयाचे ,मुख्याध्यापिका श्रीमती, प्रतिभाताई वाघ मॅडम यांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने दि11/9/2022रोजी मुंबई येथील यांच्यातर्फे श्रीमती प्रतिभा वाघ यांचे कला व संगीतमय कार्याची, दखल घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी मुंबईचे संदीप सोमन अभिनेता, दीपक नागरगोजे सुप्रसिद्ध जादूगर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे ,चेअरमन माजी तथा ,नगराध्यक्ष डॉक्टर बापुसाहेब देशमुख माजी नगराध्यक्षा जुईताई देशमुख संचालक अमित पाटील, फायर ऑल इंडिया मानव अधिकाराचे प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार संतोष कोळी, शिक्षक वर्ग यांच्याकडून कौतुक होत आहे