विविध मागण्यासाठी वंचितचा जनआक्रोश मोर्चा पुसद उपविभागीय कार्यालयावर धडकला!

32

✒️सिद्धार्थ दिवकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

पुसद(दि.15 सप्टेंबर):-वंचित बहुजन आघाडी पुसद तालुक्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे पुसद तालुका अध्यक्ष, बुद्धरत्न भालेराव, पुसद शहर अध्यक्ष दयानंद उबाळे, नेतृत्वव जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड,जिल्हा महासचिव उणकेश्वर मेश्राम, डि.के. दामोदर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात जनमोर्चाचाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चामध्ये सेकडो, श्रमिक, वंचित, कामगार, तरुण युवक तथा महिला इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजीने परिसर निनादून गेला शिंदे देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासून या सरकारचे डोके ठिकाणावर नसल्यासारखे निर्णय घेऊन शासन निर्णयाच्या नुसत्या घोषणा करत आहे परंतु प्रत्यक्षात मात्र जनतेपर्यंत कोणताही लाभ होताना दिसत नाही.

मागील महिनाभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात विशेष विदर्भामध्ये
अतिवृष्टीच्या पावसाने खूप प्रमाणात नुकसान झाले असून
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी
अतिवृष्टी ग्रस्त शेतकरी आर्थिक मदतीपासून अजूनही वंचित आहेत् दिवसेंदिवस महागाई वाढत असून पेट्रोल डिझेल व खाद्य पदार्थांच्या वाढून। गगनाला भिडल्या आहेत.

या सर्वच मागण्याच्या बाबतीत शासनाचा कोणताही अंकुश नाही. या सर्व प्रश्नाला घेऊन वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पुसद उपविभागीय कार्यालय येथे जनमोर्चा चे आयोजन केले होते.

या जन आक्रोश मोर्चाला प्रामुख्याने जिल्हा प्रमुख धनंजय गायकवाड, जिल्हा संघटक राजकुमार टाळकुटे जिल्हा महासचिव जॉन्टी विंकरे जिल्हा उपाध्यक्ष उनकेश्वर जिल्हा जिल्हा महासचिव डिके दामोदर समता सैनिक दलाचे विनोद बरडे, पुसद तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव पुसद शहर अध्यक्ष जय आनंद उबाळे पुसद शहर उपाध्यक्ष प्रसाद खंदारे मिलिंद पठाडे सुनील डोंगरे शंकर करमन्कर प्रणव भागवत सनी पाईकराव आकाश धुळे अजय बनसोडे अरुण तुपसुंदर रे विश्वास सावळे, महिला आघाडीच्या, अध्यक्ष पद्मा दिवेकर इत्यादी महिला कार्यकर्त्यांसह शेकडो कार्यकर्ते जनमोर्चाला उपस्थित होते.