३३ के.व्ही.फिटरचा लोकार्पण सोहळा संपन्न

39

🔸ग्रामीण वीज पुरवठ्याकडे विशेष लक्ष द्या – आ.डॉ.गुट्टे

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.18सप्टेंबर):-ग्रामीण भागात वीजेचा लंपडाव नेहमी सुरु असतो. त्यामुळे लोकांमध्ये महावितरण विषयी रोष पाहायला मिळतो. गावखेड्यात कर्मचारी असूनही वीजेचे प्रश्न सुटत नाहीत. तसेच ट्रान्सफर्मर, डीपी खराब झाल्यास किंवा वीजेची तार तुटल्यास, पुरवठा खंडित झाल्यास वारंवार संपर्क करुन सुध्दा संबंधित गावचे किंवा भागाचे कर्मचारी फिरकत नाहीत, असेही चित्र लोकप्रतिनिधी म्हणून कानावर येते. तेव्हा मी संबंधिताना फोन करुन सूचना देतो आणि अडचण दूर होऊन पुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याकडे विशेष लक्ष द्या, अशी अपेक्षा गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केली.तालुक्यातील कोर्दी येथील ३३ के.व्ही.उपकेंद्र अंतर्गत माखणी गावठान फिटरचे लोकार्पण आ.डॉ.गुट्टे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तेव्हा ते बोलत होते.

यावेळी गंगाखेड प्रभारी हनुमंत मुंढे, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण मुंढे, जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे, बडवणीचे सरपंच संभुदेव मुंढे, डोंगरपिंपळाचे सरपंच वैजनाथ तिडके, ढेबेवाडीचे सरपंच भाऊराव मुंढे, डोंगरजवळाचे सरपंच नितीन खोडवे, माखणीचे सरपंच रमेश शिसादे, डोंगरगावचे सरपंच दत्ता गाडे, शिरसमचे सरपंच ओमकेश केंद्रे, पोखर्णीचे सरपंच दत्ता वाळके, खादगावच्या सरपंच सावित्रीताई फड, बळीराम मुंढे, धोंडीराम मामा यांच्यासह महावितरणचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

पुढे आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, डोंगरी भागात वसलेल्या बडवणी, डोंगरपिंपळा, डोंगरगाव, डोंगरजवळा, ढेबेवाडी, माखणी, शिरसम, पोखर्णी, खादगाव अशा प्रमुख गावांना या उपकेंद्रातून वीज पुरवठा होतो. हि गावे आडवाटेला असल्यामुळे किमान रात्री तरी लोडशेडिंग करु नये. तसेच उपकेंद्राने नागरिकांच्या फोनवरुन आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर राहायला हवं. कोणत्याही गावातून सरपंच किंवा सर्वसामान्य नागरिकाने जरी फोन केला तरी त्याची दखल घेतली पाहिजे, तेव्हाच नागरिकांच्या मनात महावितरण विषयी असलेला रोष कमी होईल. त्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी संयामाने बोलावे. प्रेमाने आणि आपुलकीने वागावे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू लटपटे तर आभार वैजनाथ तिडके यांनी व्यक्त केले.