अभियंतांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात केला पाहिजे :- अमोल येडगे (जिल्हाधिकारी यवतमाळ

35

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.23सप्टेबर):- येथील उमरखेड तालुका अभियंता संघटना आयोजित औदुंबर बांधकाम साहित्य प्रदर्शनी व गृह कर्ज मार्गदर्शन शिबिरात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बोलताना बांधकाम क्षेत्रात नवनवीन मशनरी तंत्रज्ञान येत आहेत अभियंतांनी या तंत्रज्ञानाचा आत्मसात केला पाहिजे तसेच सर्वात जास्त प्रगतीचा क्षेत्र म्हणून बांधकाम क्षेत्राकडेही पाहिले जातात जास्तीत जास्त रोजगार देणारा क्षेत्र म्हणजे बांधकाम क्षेत्र असे प्रतिपादन केले.

दि 23 सप्टेंबर रोजी संजोग भवन येथे औदुंबर बांधकाम साहित्य प्रदर्शनी व गृह कर्ज मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी यवतमाळ अमोल येडगे तसेच प्रमुख उपस्थितीत सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना मॅडम, अधीक्षक अभियंता सा. बा . वि . दिपक सोनटक्के, स. संचालक नगर रचना कीरण राऊत, उपविभागीय अधिकारी डॉ . व्यंकट राठोड, तहसीलदार आनंद देऊळगावकर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला या साहित्य प्रदर्शनी कार्यक्रमात प्रदर्शनीमध्ये नागरिकांना सिमेंट, स्टील, स्टाईल, फिटिंग, प्लंबिंग, सेलिब्रेशन, कलर्स व इंटिरियर फर्निचर साहित्याचे स्टॉल लावण्यात आले होते तसेच कार्यक्रमात दीपक सोनटक्के यांनी सर्वांना मार्गदर्शन करत. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब कशाप्रकारे करा केला पाहिजे पावसाळ्यातही “जेट प्याचेम” सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून पावसाळ्यात सुद्धा ही डांबरीकरण करता येऊ शकते असे सांगण्यात आले.

या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते बांधकाम साहित्य प्रदर्शनी स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले व प्रत्येक स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली व मार्गदर्शन करत सांगण्यात आले.
तालुक्यातील अभियंता संघटनेने एकत्रित येऊन नावलौकिक केल्याने बांधकाम क्षेत्रात प्रगती होताना दिसत आहे. जिल्ह्यातून बांधकाम क्षेत्रातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग या प्रदर्शनी लाभला.

तसेच कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष राजूभैय्या जयस्वाल, भास्कर पंडागळे, दत्ता गंगासागर,भीमराव चंद्रवंशी,विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अभियंता सुरेंद्र कोडगीरवार यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेचे अध्यक्ष अभियंता सतीश पत्रे यांनी केले. यावेळी तालुका अभियंता उपाध्यक्ष राहू पंडागळे यांचे जिल्ह्यातून प्रथम पीक ग्रॅज्युएशन डिग्री धारक म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता भूषणअग्रवाल, व्यंकटेश निलावार ,वैभव कोसलगे, अभिषेक सुरते,अश्विन कन्नावार, धनंजय गावंडे, स्वराज देवसरकर, चेतन काळबांडे,राजेश दिघेवार, निलेश हेलगंड, नितीन जयस्वाल, सुधाकर काळबांडे, विनायक मुधोळ, सावंत पाईकराव,मनोज शिरडकर, अदी अभियंत्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.