आळंदी इंद्रायणी नदीच्या तीराव रील संबंधित पोलीस अधिकारी निलंबीत करावा – सुधाकर महाराज इंगळे

14

✒️नानासाहेब ननवरे(कुरूल प्रतिनिधी)

कुरुल(दि.23सप्टेंबर):- दि 22-09-2022 रोजी गुरुवारी रात्री आळंदीच्या पवित्र अशा इंद्रायणी घाटावर,माउलींच्या संजिवन समाधी मंदिरा जवळच ज्या ठिकाणी सर्व वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू स्वानंदसुखनिवासी सद्गुरु जोग महाराज यांची समाधी आहे, त्या पवित्र स्थळा जवळ काही लोकांनी मांस शिजवायला ठेवले होते.कुणी काय खायचे हा ज्याचा त्याचा व्यक्तीगत विषय आहे.पण आळंदीच्या पवित्र इंद्रायणी घाटावर हा प्रकार व्हावा ही खरंच निंदनीय बाब आहे‌.मी तर हा समस्त वारकरी संप्रदायाच्या संतांच्या विचारांचा अपमान समजतो. भविष्यात अशा कुठल्याही घटना मंदिर परिसरात घडू नये याची खबरदारी घ्यावी. जर आताच पायबंद केले नाही तर उद्या महाद्वार परिसरात हे दारु ,मांस विक्री करायला मागेपुढे पाहणार नाहीत.

मी या घटनेचा निषेध करतो…जोग महाराजांच्या समाधी जवळ असा प्रकार घडावा या पेक्षा दु:खद घटना काय असु शकेल. श्री ज्ञानेश्वर आवताडे ( विरवडे ता. मोहोळ जी. सोलापूर )यांना हा प्रकार लक्षात आला आणि यांनी या लोकांना जाब विचारत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या वेळी घटनेचा लाईव्ह फेस बुक वरून केला आहे. पण पोलिसांनी यावर कसलीच कारवाई न करता त्यांना सोडून दिले. पैसे खाऊन कारवाई केली नाही अशी चर्चा होती. त्या मुळे संबंधित अधिकारी यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावे व त्यांच्या वर गुन्हा नोंद करण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे कडून ईमेल द्वारे मा. मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व गृह विभाग यांना पाठविण्यात आले आहे. असे सुधाकर महाराज इंगळे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.