दि .25 सप्टे. रोजी जिल्हस्तरिय कार्यकर्ता क्षमता निर्माण शिबीर

59

🔸मुव्हमेन्ट फॉर पिस अँड जसटीस तर्फे आयोजन

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 24 सप्टेबर):-मुव्हमेन्ट फॉर पिस अँड जसटीस फॉर वेल्फेअर ही संघटना मागील अनेक वर्षा पासून अन्न सुरक्षा,शिक्षण, असंघटित मंजूर,आरोग्य, अंगनवाडी आदी विषयावर कार्य करित गरजवंतांना मार्गदर्शन ,प्रबोधन करित त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करित आहे.

विविध शासनाच्या योजना त्यांच्या पर्यत पोहचविण्याचे कार्य करित आहे. काम करित असतात असताना कार्यक प्रशिक्षिक्शन देणेआवश्यक असते म्हनुन एमपीजे आपल्या कार्यकर्त्या मध्ये क्षमता निर्माण व्हावी या दृष्टीने शिबिराचे आयोजन करित असते.

त्याचाच भाग म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्त्यना अन्न सुरक्षा- रेशन या विषयावर प्रशिक्षण देण्या करिता जिल्हा स्तरीय एक दिवसीय कार्यकर्ता क्षमता निर्माण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कॅम्प दिनांक 25 सप्टेंबर रोज रविवार ला एम के गार्डन फॅंक्षण हॉल, नांदेड रोड उमरखेड येथे सकाळी 10 ते 4:30 पर्यंत आयोजीत करण्यात आले आहे.

यात मुख्य प्रशिक्षक म्हणून अन्न सुरक्षा विषयांचे गाढे अभ्यासक तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रमेश कदम मुंबई उपस्थित राहणार असून सोबत हुसेन खान प्रदेश सचीव्, अल्ताफ हुसेन,वासिम खान आदी मान्यवराची उपस्थितीती राहणार आहेत.
या शिबिरा साठी जिल्हाभरातील सर्व शाखेचे पदाधिकरी ,कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

MPJ चा परिचय – हुसेन खान सा.रेशन् गट प्रमुखासोबत् चर्चा सत्र-फिल्ड वर्क,रिपोर्टींग, प्रश्न-उत्तरे (ग्रुप वाईस) ट्रेनींग सेशन राशन यंत्रणा,संघटन,और तक्रार प्रनाली या वर रमेश कदम मुंबई,यवतमाळ जिल्हया चे नियोजन,चर्चा, प्रश्न उत्तरे, जन सुनवाई तद नंतर समारोप असा हा कार्यक्रम असणार आहे.

जिल्ह्यातील व शह्ररातील सर्व सद्स्या सह समाजिक कार्यकर्ते यांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ . सै . मुजाहीद हसन यवतमाळ, उत्तमराव मोरे बाभुळगाव, सै . अतिक वणी, सै .सलीम पुसद, मजहर खान, अ .रफीक दिग्रस, शेरु सर आर्णी तौफीक मिर्झा, अ .मतीन, पांढरकवडा, जावेद एकबाल चिखल वर्धा, शेख सलमान, वाहीद खान गोंडवडसा, मनोज राठोड मुळावा, मेहबुब शेख ढाणकी जिल्हयातील सर्व एम पी जे पदाधिकाऱ्यांनी केली आहे