प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने विविध मान्यवरांचा सन्मान

71

🔸जिद्द, मेहनत, चिकाटी, परिश्रमातून समाजकार्याला मिळते प्रेरणा : राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिणीस संजीव भांबोरे यांच्या उपस्थितीत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.ग्रामपंचायत सदस्य आशिष मेश्राम यांच्या वाढदिवसानिमित्त पवनी तालुक्यातील जिल्हा परीषद शाळा चीचाळ येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणस संजीव भांबोरे बोलत होते.व्यक्तीच्या मनात, जिद्द,मेहनत, चिकाटी, परिश्रम असेल आणि त्यांना सामाजिक कार्याची जाणीव असेल तर तो व्यक्ती खरोखरच जीवनात यशस्वी ठरतो असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चुनीलाल लांजेवार तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच लोकमुद्राताई वैरागडे, माजी पंचायत समिती सदस्य नरेंद्र बिलवणे, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज वैरागडे, ग्रामपंचायत सदस्य निलेश काटेखाये उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने भाकरे सर, मंगला बोरकर, मनोज वैरागडे यांनी कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल कोरोना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच ग्रामपंचायत सदस्य आशिष मेश्राम यांचा शाळा व्यवस्थापन समिती आणि प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे वतीने सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य आशिष मेश्राम यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त कान्हेट मध्ये शिक्षण घेणाऱ्या ३८ विद्यार्थ्यांना स्वतःच्या पैशातून वह्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, पत्रकार, भाकरे सर, अनेराव मॅडम, फंदे मॅडम, धांडे मॅडम, मरगडे मॅडम शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .