विद्यार्थ्यांनी गुणवंत होऊन कीर्तिवंत व्हावे – डॉ. रश्मी बंड

28

🔸गो. वा. महाविद्यालयात गुणवंताचे अभिनंदन समारंभ

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.27सप्टेंबर):- विद्यार्थी हा महाविद्यालयाचा कणा आहे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या ज्ञानाच्या भरोशावर गुणवंत ठरल्या जाऊ शकतो त्यामधून महाविद्यालयाची तसेच त्याची कीर्ती सर्वदूर पसरून नावलौकिक होत असल्याने विद्यार्थ्यांनी गुणवंत होऊन किर्तीवंत व्हावे असे आव्हान गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ.रश्मी बंड यांनी केले आहे त्या गो. वा.महाविद्यालयात आयोजित गुणवंत विध्यार्थी समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जनहित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.नरेंद्रसिंह चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून वंदनाताई वासुदेव भांडारकर सहिष्णू फाउंडेशन ब्रह्मपुरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सिंग, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. रवी रणदिवे यांची उपस्थिती होती. डॉ. बंड यांनी पुढे विद्यार्थ्यांना जीवन कसे सुंदर करता येईल याविषयीचे अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर वंदनाताई भांडारकर यांनी मनोगत व्यक्त करताना संहिष्णू फाउंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती बद्दल माहिती दिली व महाविद्यालयातील विविध गटातील 12 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. महाविद्यालयाचा सर्वोच्च जनहित पुरस्कार सुरज रामभाऊ दडमल याला देऊन गौरविण्यात आलेले आहे.

अन्य पुरस्कार तसेच विषय निहाय,वर्ग निहाय गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले आहे. कार्यक्रमाचे औचित्य साधून सिनेट सदस्या किरण गजपुरे यांचे या निमित्ताने सत्कार करण्यात आले आहे. कार्यक्रमास पालक, माजी विद्यार्थी, प्रायोजक, तसेच शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ. संजय सिंग तर संचालन प्रा. डॉ.दीपक मोरांडे, प्रा. डॉ.निकिता मिश्रा उपस्थिततांचे आभार प्रा.डॉ. रवी रणदिवे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे विद्यार्थी बहुसंख्येनी उपस्थित होते.