बांधकाम विभागाने कारवाईचे खोटे पत्र देऊन जनशक्ती संघटनेची फसवणूक

19

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.28सप्टेंबर):- कोर्टी ते आवटी रस्ता मुदतीत पूर्ण न केल्यामुळे आरएसआयआयएल-एनपी-इन्फ्रा प्रा. लि. कंट्रक्शन कंपनीला लाखो रुपयांचा दंड आकारल्याचे खोटे पत्र देऊन जनशक्ती संघटनेची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ तसेच सांभवी कार्यकारी अभियंता-निरंजन तेलंग यांच्यावरती कारवाई करावी या मागणीसाठी शेकडो महिला घेऊन दि.30/09/22 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय,अकलूज यांच्या कार्यालयासमोर बांगडी घेऊन आंदोलन करणार, दौंड-करमाळा -परंडा-बार्शी ते उस्मानाबाद राज्य महामार्ग-68 या रस्त्याची दुरुस्ती व सुधारणा करणे बाबतच्या कामात निविदा शर्तीनुसार विहित मुदती मधील काम अपूर्ण होते.

याबाबत जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आंदोलन केल्यानंतर संदर्भीय पत्र दि.18/02/2022 रोजी मा.उबाळे सो.उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग,करमाळा यांनी कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,अकलूज मा.निरंजन तेलंग यांच्या सांगण्यानुसार सदर कंट्रक्शन कंपनीला प्रतिदिन 8.50 लाख रु. इतक्या दराने दंडाची आकारणी चालू असल्याचे पत्र जनशक्ती संघटना,महाराष्ट्र राज्य संस्थापक अतुल खूपसे यांना आदा केले होते.परंतु सदर कंट्रक्शन कंपनीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाने आकारलेल्या कोणत्याही दंडाची वसुली केलेली नाही.जनशक्ती संघटनेची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी फसवणूक केली आहे.

सदर कन्स्ट्रक्शन कंपनी व ठेकेदारांना कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग हे पाठीशी घालत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी. कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांची पूर्व पार्श्वभूमी पाहता तेलंग हे पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग,पुणे येथे कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात आर्थिक देवानघेवाणीतून ठेकेदारांना निविदा मधील अटी व शर्तींची पूर्तता न करता कामे दिलेले आहेत.तसेच बोगस बिले अदा करण्यात आलेले आहेत.याबाबत विविध संघटनांनी भ्रष्टाचाराबाबतच्या अनेक तक्रारी शासन दरबारी प्राप्त आहेत.वादग्रस्त अधिकारी तेलंग यांची एफडीए प्रकरणात अकलूज येथे बदली झालेली असून निरंजन तेलंग यांनी अकलूज विभाग येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे.यातून तेलंग यांनी मोठ्या प्रमाणात नामी-बेनामी संपत्ती जमवल जमवले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने जनशक्ती संघटनेची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ जनशक्ती संघटनेचे संस्थापक मा.अतुल(भाऊ)खूपसे-पाटील यांच्या आदेशानुसार व महिला प्रदेशाध्यक्ष मा.वनिताताई बर्फे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांना सोबत घेऊन मा.कार्यकारी अभियंता सो.सार्वजनिक बांधकाम विभाग,अकलूज यांच्या कार्यालयासमोर दि. 30/09/2022 रोजी शुक्रवारी बेमुदत बांगडी आंदोलन करणार आहेत,याची तात्काळ नोंद घेऊन कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करणार यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.