नाशिक मध्ये महाबौद्ध धम्म मेळावा, महाश्रामनेर शिबिरात उपासकांसाठी प्रशिक्षण

28

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.29सप्टेंबर):- नाशिक शहरात अखिल भारतीय समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने महा बौद्ध धम्म मेळावा आणि महा श्रामनेर शिबिराचे नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त महाश्रामनेर शिबिरात मंगळवार (दि. २७) रोजी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत उपासकांसाठी श्रामनेर प्रशिक्षणासह धम्म विषयक विविध कार्यक्रम झाले.

या महाश्रामणेर शिबिरात भन्ते शीलरत्न महाथेरो यांनी दशशील सांगितले. त्यानंतर भिखू धम्मरत्न यांनी उपासकांना श्वासावर नियंत्रण ठेवण्यासाठी आनापानसटी म्हणजे ध्यान, साधना, विपश्यना यासंबंधीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. यामुळे धम्म साधक आणि विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढते, श्वासाला गती मिळून चांगली स्मृती प्राप्त होते, असेही त्यांनी सांगितले. आपल्या शरीरात रक्त शुद्धीसाठी ध्यानधारणा आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. धम्म मेळावा तथा महाश्रामनेर शिबिरानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त उद्घाटन सोहळा, श्रामनेर दिक्षा प्रारंभ, श्रामनेर प्रशिक्षण, गोल्फ क्लब ते म्हसरूळ भव्य मिरवणूक, गोल क्लब ते नाशिकरोड, सातपूर, गोल्फ क्लब ते बौद्ध लेणी बौद्ध मिरवणूक काढण्यात आली, अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक व बीएमए ग्रुपचे अध्यक्ष मोहन अढांगळे यांनी दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश बनसोड, प्रदीप पोळ, राहुल बच्छाव, भदंत धम्मरत्न, के. के. बच्छाव, गुणवंत वाघ, बाळासाहेब शिरसाठ, अशोक गवई, नितीन मोरे, अरुण काशीद, शिवाजी गायकवाड, अविनाश गायकवाड ,वाय. डी. लोखंडे, डी. एम. वाकळे आदी सह धम्म बांधव प्रयत्न करत आहेत.