स्वच्छ भारत अभियान अंतर्गत धुळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धुळगाव येथे रांगोळी स्पर्धाचे आयोजन

27

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.29सप्टेंबर):- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धुळगाव येथे रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्यात.श्रीमती.जानराव मॅडम व श्रीमती.पोतदार मॅडम यांनी परीक्षणाचे कामकाज पाहिले.

मुख्या.श्री.सय्यद सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाने सर्व शिक्षकांनी नियोजन केले.शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,गोपीनाथ भाऊ गायकवाड ,उपाध्यक्ष प्रमोदभाऊ ठाकरे व सदस्यांनी भेट देऊनन पाहणी केली.सर्वांचे कौतुक केले व समाधान व्यक्त केले.विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जातील असे जाहीर केले.