शिक्षण विभागाचा 20 पटसंख्या खालिल जि.प. शाळा बंद करण्याचा आदेश रद्द करा..!

35

🔸गोर सेनेची जिल्हाधिकारीना निवेदनातून मागणी 

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड:-(दि. 6 ऑक्टोबर 2022) तालुक्यातील गोर सेना संघटनेच्या वतीने येथील तदसीलदार आनंद देऊळगावकर यांच्या मार्फत दि. 6 ऑक्टोबर 2022 रोजी शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय 0 ते 20 पटसंख्या खालील जि.प. शाळा बंद करण्याचा आदेश रद् करण्याकरीता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने राज्यातील जिल्हा परिषदेच्या 0 ते 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्यावर हालचाली सुरत केल्या आहेत या निर्णयामुळे तांडा वस्ती ,वाड्यावरील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांच पुढील भवितव्य अंधारात जात आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी गरीब कुटुंबातील असून सध्याच्या महागड्या काळात शिक्षण घेणे सोपे राहिले नाही त्यामुळे ह्या शाळा बंद झाल्या तर विद्यार्थ्यांची संपूर्ण पिढी वाया जाणार आहेत. कारण गावात, तांडा वस्तीतील शांळा बंद पडल्याने गोर – गरिबाचे मुले शिक्षणा पासून वंचीत राहू शकते.

बहुतांश विद्यार्थी डोगर दर्यात, वाडी वस्तीत, तांडयातील आदिवासी, दलीत, गोर बंजारा बहुजन समाजातील विद्यार्थी आहेत . जे शिक्षणा पासून कोसो दुर आहेत . केन्द्रसरकार व महाराष्ट्र सरकार या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आणत आहेत.

आरटीआय कायद्यानुसार येत्या एक ते आठ वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार असून त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूलभूत गरजा हिसकावण्याचा काम शासन करीत आहे. एकीकडे सरकार मुलांना सक्तीचे शिक्षण करीत आहेत तर दुसरीकडे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करीत आहे.

सदरील प्रास्तावित निर्णय राज्य सरकार च्या शिक्षण विभागाने तात्काळ थांबवले नाहीतर गोर सेना राष्टीय अध्यक्ष प्रा. संदेशभाऊ चव्हाण व प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रा . संपत चव्हाण यांच्या नेत्वृवाखाली संपुर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

यावेळी गोर सेना अमरावती विभाग उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, गोर सेना तालुका अध्यक्ष विजय जाधव (कान्हा), गोर सेना तालुका उपाध्यक्ष गोपाल जाधव, गोरसेना तालुका सचिव राहुल राठोड,पंकज राठोड, स्वप्निल राठोड ,सतीश जाधव, संदीप जाधव,सोनू राठोड,पवन राठोड अदी गारसेना पदाधिकारी उपस्थित होते.