पीक कर्ज वाटप करा अन्यथा अन्नत्याग आंदोलन करणार- हक्कानी शेख

37

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.7ऑक्टोबर):- जिवती तालुका आदिवासी नक्षलग्रस्त डोंगराळ भाग असुन येथील मुख्य व्यवसाय शेती असून शेतीवरच शेतकरी उदरनिर्वाह करतात शेतीचे हंगामासाठी बीज बियाने खत औषध घेण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची शासना कडून व्यवस्था आहे तालुक्यातील शेतकरी वर्गांनी पीक कर्जा घेण्यासाठी आदिवासी सोसायटी जिवती येथे अर्ज केला असून आज पर्यंत तालुक्यातील काही शेतकऱ्यांना पीककर्ज मंजूर झाला नाही.

शेतकऱ्यांनी वारंवार सोसायटीच्या चकरा मारुन मारुन थकले असून आदिवासी सोसायटीचे जिवती चे शिवाजी नेताम ( बाबू ) शेतकऱ्यांना समाधान कारक माहिती देत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिवती तालुकाध्यक्ष हक्कानी शेख यांनी तहसीलदार जिवती यांना निवेदन देवून मागणी केली आहे की या आठ दिवसांत पीक कर्ज वाटप करा अन्यथा तहसील कार्यालया समोर आंदोलन अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला