नवरात्री आणि दसऱ्याला संविधानिक आशय देणारे नवी मुंबईकर!

28

नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रकरणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे विरुद्ध लोकनेते दि बा पाटील हा संघर्ष साऱ्या देशाने पाहिला.शिवसेना कॉग्रेस राष्ट्रवादी सरकारने लादलेल्या एकतर्फी निर्णयाविरोधात येथली ओबीसी जनशक्ती लढली आणि विजयी झाली.सरकारकडे लढण्यासाठी सत्ता,पोलीस आणि धनशक्ती असते.लोकांकडे लढण्यासाठी विचारांची शक्ती असावी लागते.लोककल्याणकारी विचारात ताकद नसती? तर माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या लिहिणन्याला आणि तुमच्या वाचण्याचा काहीच अर्थ उरला नसता?.अमेरिकन डॉलर समोर,रुपया आज एक टक्क्याने घसरला,अशी बातमी झळकली.2023 मध्ये मोठी मंदी येणार? अशी धोक्याची सूचना अर्थतद्न्य देत आहेत.अर्थात रोज मोल मजुरी करणाऱ्या गरिबांना नोटबंदी नंतर आलेली मंदी खूप अगोदर समजली.गरीब लोकांची व्यथा त्यांच्यात उठण्या बसणाऱ्या माणसाला लगेच समजते.अर्थात प्राप्त परिस्थितीत मार्ग काढणाऱ्या सामान्य जणांची व्यथा आणि उपाय सांगण्याचा या लेखात माझा प्रयत्न असणार आहे.

देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकारे असल्यामुळे हिंदू सण कसे उत्साहात होत आहेत? ही बातमी एसटीच्या पाठीवर सर्वांनी वाचली असेल.अर्थात उपाशी एसटी कर्मचारी संप साऱ्या देशाने पाहिला आहे.सरकार बदलल्यानंतर एसटीचा प्रश्न सुटला नाही.परंतु हिंदू सण आता आनंदात होत आहेत? ही जाहिरात गरीब कष्ठकरी एसटी कामगार आणि शेतमजूर मच्छीमार यांच्या भलभळत्या जखमेवर मीठ चोळण्याचा निंद्य प्रकार आहे.

ज्यांच्या कडे पन्नास पन्नास खोके पैसा आहे अशा उद्योगपती राजकीय नेते,बिल्डर, अदानी अंबानी या व्यापारी वर्गाची सोने खरेदी,गरबा दांडिया यातील नेत्रदीपक श्रीमंती हा शासनाच्या जाहिरातीचा विषय आहे.तर सिलेंडर,किराणा सामान,लाईट बिल मुलांची शाळेची फी,कर्जाचे हफ्ते यात मेटाकुटीला आलेल्या शोषित उपेक्षित हिंदू माणसाला हे सण म्हणजे आपत्ती ठरले आहेत.धर्मावर अढळ निष्ठा असणारे गरीब यावर बोलायला घाबरतात? यात देवा बरोबरच पुरोहित धर्ममार्तंडाची भीती? दहशत आहेच.

जगात गरिबांची व्यथा पाहणाऱ्या लोकांना नेहमीच दया,करुणा वाटली यातून मुस्लिम ख्रिशन धर्मांचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला.गरिबांची सेवा करण्यात ख्रिश्चन बांधवांनी आरोग्य शिक्षण यात भारतात मोठी आघाडी घेतली.भारतातील 85 टक्के मागासवर्गीय माणूस कुठे ना कुठे गरिबी मुळे आत्महत्या करतो? कुठे दारूत व्यसनी होतो? तर कुठे धर्म बदलतो.या साऱ्या घटना आम्ही नीट अभ्यासल्या पाहिजेत.”धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर?” अशी टोकाची भूमिका घेणाऱ्या हिंदुत्ववादी विचारवंतांनी मानवी हक्क नाकारल्यामुळे झालेल्या मागास वर्गीय धर्मांतराची नोंद घेतली पाहिजे.धर्मचिकित्सा,धर्म सुधारणा करणाऱ्या विचारवन्त लोकांची भूमिका मला महत्वाची वाटते.परंतु हिंदू धर्माचीच चिकित्सा का करता?. तुम्ही मुस्लिम आणि ख्रिशन यांच्यावर का बोलत नाही?.असे प्रश्न मला याच आठवड्यात मोठ्या त्वेषाने विचारणारे उग्र कोळी बांधव भेटले.अर्थात त्यांना समजावून सांगितल्यावर माझी संविधानिक भूमिका त्यांनी मान्य केली.

भारतीय संविधान निर्माण करणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी येथल्या हिंदू स्त्रियांची नरक यातना देणारी विषमता संपविण्यासाठी हिंदू कोड बिल लिहून मोठी हिंदू धर्म चिकित्सा आणि सुधारणा संविधानाच्या माध्यमातून केली आहे.भारताच्या संविधान सभेत हिंदू धर्म अभिमान्यांनी प्रचंड विरोध त्यांना केला आहे.त्या सभा आजही आपण लिखित पुराव्यानिशी पाहू शकतो.जेव्हा अस्पृश्य बांधवा वरील अन्याय थांबविण्याचा मार्ग दिसत नाही.हे पाहूनच त्यांनी समता बंधुता करुणा न्याय सांगणारा जागतिक कीर्तीचा बौद्ध धम्म स्वीकारला.याअगोदोर बऱ्याच वर्षांच्या इशारे रुपी संघर्ष करून,जगातल्या सर्वच धर्मांची मानवी मूल्यानुसार चिकित्सा करून,त्यांनी याच मातीतला एकविरा पुत्र बुद्धांचा धम्म स्वीकारला.तरीही हिंदू वारसा कायदे आणि भारतीय संविधान वाचले तर हिंदू धर्म सुधारक डॉ बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू मुस्लिम ख्रिशन शीख पारशी यांच्यासाठी आजही हिमालयाच्या उंचीचे महापुरुष आहेत.त्यांच्या धर्मातराबात, “इच्छा नसताना धर्म बदलावा लागला” हे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे उद्गार स्वतःतल्या खुज्या विचारसरणीचे द्योतक आहेत.देशातील सर्वच धर्मातील सण उत्सव परंपरा यांना संविधानाचा आदर्श ठेऊन कसे साजरे करता येईल?.किंबहुना त्यांना आमच्या राष्ट्रीय जीवनाच्या सामूहिक सार्वजनिक हिताशी कसे जोडता येईल?.हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या नवंरात्रीत आणि विजयादशमी उत्सवात मी नवी मुबंईत पाहिला.

कोरोना नंतर नवी मुबंई महापालिकेत निवडणुका झाल्याचं नाहीत.पहिले निवडून आलेले सभागृह अस्तित्वात असताना दुसरे नगरसेवक प्रतिनिधी मंडळ निवडून आणणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे.आपले संविधान अशा लोकशाहीची ग्वाही देते.हे संकेत दुर्लक्षित करून छुप्या हुकूमशाही पद्धतीने अनेक ठिकाणी नागरिकांच्या अधिकारा वर गदा आणली जात आहे.देशातील ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य अभेद्य अतिरेकी महायुती जेथे ओबीसी एससी एसटी यांची सत्ता आहे,तेथे असले मनुवादी प्रकार करत आहे.नवी मुबंई महापालिकेत अत्यन्त महागड्या म्हणजे चार कोटी रुपये प्रतिगुंठा भाव असलेले भूखंड सिडको विकत आहे.अर्थात स्थानिक लोकप्रतिणींची लोकसत्ता म्हणजे नवी मुबंई महानगर पालिका, त्यांनी सार्वजनिक उपक्रमासाठी आरक्षित केलेले भूखंड विकणारे नगरविकास खाते हे मागील काळात मराठा एकनाथ शिंदे आणि आताचे मुख्यमंत्री यांच्या कडे असताना येथल्या आगरी कोळी कराडी बौद्ध बारा बलुतेदार यांच्या तसेच नवी मुंबईत आशेने रहायला आलेल्या सर्वच भारतीय जनतेवर अन्याय होता.एमएममआरडीए म्हणजेच ठाणे पालघर मुंबई रायगड या क्षेत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागु पाटील यांच्या कूळ कायद्याने इथल्या भूमिपुत्र बांधवाना हक्काच्या जमिनी मिळाल्या.याच जमिनी पुन्हा लाटण्या साठी मराठा ब्राह्मण वैश्य पूर्वीचे खोत हे उच्चवर्णीय याच भागावर आपली सत्ता ठेवण्याच्या प्रयत्नात आज पुन्हा आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी नगरसेवक यामुळेच त्यांच्या आरक्षणासह संपविण्याचा सर्व पक्षीय म्हणजे भाजप कॉग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उजवे डावे यांचा डाव आहे.

भारतीय संविधानाने दिलेले आदेश तंतोतंत पाळणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य ठरते.आज नगरसेवक नसताना वाशी येथील युवा नेते निशांत भगत यांनी राज्यकर्त्यांच्या व्यापारी भूखंड विक्रीला न्यायालयात आव्हान दिले.नवी मुंबईतील समस्त नागरिकांचा खरा आवाज ज्यात स्थानिक भूमिपुत्र आणि शहरी नागरिकांचे ऐक्य येथे पाहायला मिळाले.ही चळवळ लोकचळवळ व्हावी,अशी मूळ मातृसत्ताक परंपरेतून आलेल्या श्रीमती फशीबाई भगत या 2015 ते 2020 या काळातील माजी नगरसेविका आईंचे म्हणणे होते.अत्यन्त साधी राहणी आणि लोकांना आईच्या ममतेने जोडणारी ही माऊली मला नेहमीच जेऊ खाऊ घालत असते.अनेक पत्रकार कार्यकर्ते माझ्या सारखाच पाहुणचार अनुभवत आहेत.अर्थात अतिथी सत्काराची ही आगरी कोळी मातृसत्ताक संस्कृती या घरात आम्ही नेहमीच अनुभवतो.याच माउलीने आजचे दशरथ भगत, माजी विरोधी पक्ष नेते नवी मुबंई मनपा, याना घडविले आहेत.हे ते अभिमानाने सांगतात.याच भगत परिवाराने लोकनेते दि बा पाटील यांच्या जमीन हक्कांचा आदर्श संघर्ष,नवी मुंबईत जपला आहे.

दि बा पाटील नामकरण आंदोलनानंतर या यशाला नवीन आशय देत सर्व जाती धर्म,सर्व पक्ष आणि नागरिकांशी चर्चा करून नऊ रात्री, गरब्याच्या तालावर नाचणाऱ्या नवी मुबंई परिसरात नवी मुंबई विकास आराखड्यावर मोठ्या प्रमाणात लोक चर्चा घडवून आणली.लोकांचे संविधानिक अधिकार नवं दिवस घरा घरात फिरून नवा आशय,जुन्या नवं रात्रीस देणारे दशरथ भगत हे एका पक्षाचे एका समाजाचे राहिले नाहीत.त्यांच्यातील चिंतनशील प्रगल्भ नेतृत्व या निमित्ताने महाराष्ट्राच्या समोर येत आहे.भारतीय संविधान हिंदू सणांमध्ये सर्व धर्मीयांत पोहचविण्याचा हा नवी मुबंई चा अनोखा नवरात्रोत्सव,नव्या भारताची नवी भूमिका ठरावा?.दसरा सणात तर सारे आपापल्या कुटूंबाच्या आनंदात मग्न असतात.याच दिवशी आपला वाढदिवस सिडको मनपा यांच्या अन्याया विरोधात वाशी च्या शिवाजी चौकात उपोषण करून,शेकडो लोकांच्या उपस्थितीत नवा ऐतिहासिक विक्रम त्यांनी घडवून आणला.

नवी मुबंई महानगर पालिका विकास आराखडा,नागरिक लोकप्रतिनिधी यांना विश्वासात न घेता? परस्पर निर्णय घेणारी आयुक्त आणि मंत्रालय प्रशासन मंडळी लोकशाहीचा बळी देत असताना?.दसऱ्याच्या सणाला नव्या संविधानिक नजरेने, बारा हजार नागरिकांच्या स्वाक्षरीसह जमा करून,त्या कागदपत्रांच्या सहाय्याने स्वतःची तुला करून ते तक्रार अर्ज नवी मुंबई पालिकेस लेखी पोहच पावतीसह सादर करण्याचा,हा लोकशाहीचे चक्र गतिमान करणारा नवरात्रोत्सव नवंउत्सव ठरला.या ऐतिहासिक कार्यक्रमास माजी खासदार संजीव नाईक आणि मी स्वतः शेकडो नागरिक पत्रकार यांच्यासह उपस्थित होतो.वेसावे कोळीवाड्यात भंडारी मासेलकरं आई ही मुंबई मनपाने बेकायदेशीर तोडलेल्या आपल्या घरांचा संघर्ष याच नवरात्रीत करत आहे.याच प्रमाणे नोटीस न देता फोडलेल्या घरासाठी कोळी शारदा आई नाखवा ही न्यायालयीन संघर्ष करीत आहे.या मातृसत्ताक महिला आणि त्याची लढणारी मुले मग ते मनोज माशेलकर,रितेश नाखवा,निशांत भगत,दशरथ भगत हे आपली मातृभूमी,आपली आई आपली महामुंबई यांच्या जमीन हक्कांची लढाई नवंरात्री आणि दसऱ्याच्या हजारो वर्षांच्या जुन्या परंपरेला नवा मातृसत्ताक साज देऊन लढत आहेत.तो खऱ्या भारतमातेला तिच्या सुपुत्रांनी केलेला मनापासून नमस्कार नव्या संविधानिक नवरात्र आणि दसऱ्याच्या सणांचे स्वरूप तुमच्या मनात नवी लोकशाहीची पालवी फुलवेल?.अशी आशा व्यक्त करतो.
जय भारत!

✒️सुलोचनापुत्र:-राजाराम पाटील(केगाव उरण,जिल्हा- रायगड)मो:-8286031463